ETV Bharat / state

Eknath Shinde in Satara मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे साताऱ्यात खळबळजनक वक्तव्य

author img

By

Published : Aug 12, 2022, 10:19 PM IST

Updated : Aug 12, 2022, 10:37 PM IST

बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता, असे खळबळजनक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी साताऱ्यात केले आहे. त्यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या वर्तुळातून प्रतिक्रिया ( Shiv Sena ) उमटू लागल्या आहेत.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

सातारा बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता, असे खळबळजनक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) महाबळेश्वरमधील तापोळा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केले. मुंबई कर्मभूमी तर सातारा जन्मभूमी मुंबई माझी कर्मभूमी असली तरी सातारा माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे आपल्या लोकांनी केलेले स्वागत अधिक आनंददायी असते. आमचे सरकार हे शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार ( Shiv Sena BJP coalition government ) असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) आणि मी हे सरकार आणखी पुढे नेत आहोत. माझ्यासारखा सामान्य माणूस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यभरात जोरदार स्वागत झालं. आपला मुख्यमंत्री झाल्याचा गाव खेड्यातील लोकांना आनंद झाला. मी गोरगरीबांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवीन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे

तीन दिवसात खाते वाटप येत्या १५ ऑगस्टपर्यंत म्हणजेच ३ दिवसांत मंत्र्यांचे खातेवाटप होईल. आमचे सरकार हे डबल इंजिन सरकार असून आम्ही भविष्यात डबल स्पीडने काम करू, असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. साताऱ्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. साताऱ्याचा पश्चिम भाग पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या भागाच्या विकासाच्या विचार सुरू असून लवकरच या बाबतीत आवश्यक ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आले जन्मगावी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील तापोळा-दरे या आपल्या मूळ गावी आले होते. यावेळी तापोळ्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तापोळ्यात पोहचताच सर्वात आधी पद्मावती देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर भेटायला गेलेल्या नागरिकांशी संवाद साधला. लोकांच्या आणि देवीच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत झाले. मी म्हणजेच सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला आहे. त्याचा सर्वांना आनंद झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा ध्वजाचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'हर घर तिरंगा' उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करुन दरे गावातील ग्रामस्थांना तिरंगा ध्वजाचे वितरण केले. यावेळी वाईचे आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्र्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील उपस्थित होत्या.

मुख्यमंत्र्यांवर जेसीबीने पुष्पवृष्टी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात आले. यावेळी जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई ( Minister Shambhuraj Desai ) यांच्यावर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच जिल्हा पोलिस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

हेही वाचा - Sanjay Ruat यांचा असा आहे तुरुंगातील डाएट प्लॅन

Last Updated : Aug 12, 2022, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.