ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेला एक तरी फोटो प्रसिध्द करावा - जयंत पाटील

author img

By

Published : Oct 14, 2019, 5:42 PM IST

आम्ही मातीतील कुस्ती खेळणारे, पण मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेला एक फोटो प्रसिद्ध करावा, अशी टीका जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

सांगली - आम्ही मातीतील कुस्ती खेळणारे, पण मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेला एक फोटो प्रसिद्ध करावा. एकदा कळूद्या तेल लावल्यावर ते कसे दिसतात, अशा शब्दात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टिंगल केली. यावेळी जयंत पाटील यांना हसू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांच्यावरील खालच्या पातळीवरची टीका महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, असा इशार त्यांनी दिली. तसेच त्यांनी काँग्रेस आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेतून भाजपवर निशाणा साधला. या वेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या शरद पवारांच्यावरील विधानांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. भाजप सरकारने ईडीची कारवाई करून शरद पवारांच्या विरोधात कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील तरुण आज पेटून उठला आहे. भाजप-सेनेला महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल, असा इशारा पाटील यांनी दिला.

मुख्यमंत्र्यानी आम्ही तेल लावून तयार आहोत, पण समोर कोणी पैलवान नाही. या टीकेवर बोलताना पाटील यांनी आम्ही मातीतील कुस्ती खेळणारे आहोत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तेले लावलेला एक फोटो प्रसिद्ध करावा. एकदा कळूद्या तेल लावल्यावर ते कसे दिसतात. अशा शब्दात पोट धरून हसु आवरत जयंत पाटील यांनी फडणवीस यांची टिंगल करत फोटो प्रसिद्ध करण्याचे आव्हान दिले. तीन वेळा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या तेल लावलेल्या फोटोची कल्पना करत आणि हसू आवरत ही प्रतिक्रीया दिली.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर एका व्हिडिओ क्लिपवरून टीकांवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. महाराष्ट्र परवारांच्यावरील अशी खालच्या पातळीवरील टीका सहन करणार नाही, असा इशारा जयंतराव पाटील यांनी दिला. राज्यात निवडणुकीची परस्थिती बदलत आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Intro:File name - mh_sng_02_jayant_patil_on_bjp_vis_01_7203751 - mh_sng_02_jayant_patil_on_bjp_byt_03_7203751

स्लग - मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले एक तरी फोटो प्रसिध्द करावा,हसत..हसत जयंतराव पाटलांनी फडणवीसांची उडवली टिंगल...

अँकर - आम्ही मातीतील कुस्ती खेळणारे, पण मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले एक फोटो प्रसिद्ध करावा,एकदा कळू द्या तेल लावल्यावर ते कसे दिसतात,अश्या शब्दात पोट धरून हसत,जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टिंगल उडवली आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांच्यावरील खालच्या स्तरातील टीका,महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही,असा इशारा देत राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता येईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.ते सांगली मध्ये बोलत होते.Body:राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगलीत आज पत्रकार परिषदेतून भाजपावर निशाणा साधत,पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या शरद पवारांच्यावरील विधानांचा यावेळी पाटील यांनी खरपूस समाचार घेतला.भाजपा सरकारने ईडीची कारवाई करून
शरद पवारांच्या विरोधात कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला आहे,यामुळे महाराष्ट्रातील तरुण आज पेटून उठला आहे,आणि भाजप-सेनेला महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल,असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

तसेच मुख्यमंत्री यांनी आम्ही तेल लावून ,तयार आहोत,पण समोर कोणी पैलवान नाही,या टीकेवर बोलताना पाटील यांनी आम्ही मातीतील कुस्ती खेळणारे आहोत, पण मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले एक फोटो प्रसिद्ध करावा,एकदा कळू द्या तेल लावल्यावर ते कसे दिसतात,अश्या शब्दात पोट धरून हसु आवरत जयंत पाटील यांनी फडणवीस यांची टिंगल उडवत तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करण्याचे आव्हान दिले ,तीन वेळा पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्या तेल लावलेल्या फोटोची कल्पना करत हसू आवरत ही प्रतिक्रिया दिली.

तर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर एका व्हिडीओ क्लिपवरून केलेल्या टीकावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे.पण महाराष्ट्र परवारांच्यावरील अशी खालच्या पातळीवरील टीका सहन करणार नाही,असा इशारा जयंतराव पाटील,यांनी देत.आज राज्यात निवडणूकीची परिस्थिती बदलत आहे.आणि काँग्रेस -राष्ट्रवादीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार .असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

बाईट - जयंतराव पाटील .


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.