ETV Bharat / state

Daring Robbery In Sangli : धाडसी दरोडा, हातपाय बांधून लाखोंचा ऐवज लंपास

author img

By

Published : Dec 23, 2022, 2:27 PM IST

Daring Robbery In Sangli
धाडसी दरोडा

शहरामध्ये एका घरावर धाडसी दरोडा (Daring robbery in Sangli) पडला आहे. शहरातल्या कर्नाळ रोडवरील दत्तनगर येथे पहाटेच्या सुमारास हा दरोडा पडला आहे. पाच ते सहा दरोडेखोरांनी बंगल्यामध्ये घुसून घरातल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी (Robbers threaten to kill) दिली. (Sangli Crime) यानंतर हात-पाय बांधून घरातील सव्वा आठ तोळे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास (loot jewelery and cash) करण्यात आली आहे. (Latest news from Sangli)

दरोडा प्रकरणी पोलीस अधीक्षक मत मांडताना

सांगली : पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती याप्रमाणे रोडवरील दत्तनगर आशीष चिंचवाडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरातील सर्व जण झोपलेले असताना अज्ञात दरोडेखोरांनी घराच्या मागील दरवाज्याने प्रवेश केला. (Daring robbery in Sangli) त्यानंतर चाकूचा धाक दाखवत घरातल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी (Robbers threaten to kill) दिली. त्यानंतर काही जणांचे हातपाय बांधले आणि चिंचवड यांच्या आईच्या गळ्यात असणारे सव्वा आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. (Sangli Crime) त्यानंतर घरातल्या कपाटात असणारे चांदीचे आणि सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये रोकड, असा मुद्देमाल घेऊन पोबारा (loot jewelery and cash) केला आहे. (Latest news from Sangli)

दरोडेखोरांच्या शोधासाठी तीन पथके : या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोरीचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे. दरम्यान सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन दरोड्याची माहिती घेत गतीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर दरोडेखोरांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आल्याचे माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.