ETV Bharat / state

MLA Rajan Salvi ACB Inquiry Case: बांधकाम विभागाकडून घराचे मूल्यांकन करताना राजन साळवी यांना भावना अनावर

author img

By

Published : Mar 6, 2023, 9:22 AM IST

Updated : Mar 6, 2023, 9:34 AM IST

ठाकरे गटाचे निष्ठावंत आमदार राजन साळवी यांची सध्या एसीबी चौकशी सुरू आहे. त्यानुसार त्यांच्या रत्नागिरी शहरातील राहत्या घराचे देखील आज मूल्यांकन करण्यात आले. एसीबीने दिलेल्या नोटिसीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मूल्यांकन केले. यावेळी राजन साळवी यांना आपल्या भावना अनावर झाल्या. या साऱ्या गोष्टीबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू देखील अनावर झाले.

MLA Rajan Salvi ACB Inquiry Case
राजन साळवी यांना भावना अनावर

प्रतिक्रिया देताना साळवी यांना भावना अनावर

रत्नागिरी : मोठ्या कष्टाने हे घर उभारले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने केले गेलेले मोजमाप वेदनादायी होते, अशा भावना आमदार राजन साळवी यांनी बोलून दाखवल्या. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे रडायचे नाही, आता लढायचे असा निर्धार देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला. राजन साळवी यांच्या घरी अधिकारी मोजमाप करण्यासाठी आले, त्यावेळी साळवी देवपूजेला बसलेले होते. दरम्यान यापूर्वी देखील राजन साळवी यांच्या जुन्या घराचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर आज आमदार राजन साळवी यांच्या राहत्या घराचे मूल्यांकन करण्यात आले.


प्रकरण काय : गेले काही दिवस आमदार राजन साळवी यांची रायगड एसीबी चौकशी सुरू आहे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. राजन साळवी यांना उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता खर्चा संदर्भात जवाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. रायगड एसीबी कार्यालयात त्यानुसार आमदार राजन साळवी यांनी तीन वेळा चौकशीसाठी हजेरी लावली होती. राजन साळवी यांचे स्वीय साहाय्यक सुभाष मालप यांची देखील चौकशी झाली. दरम्यान राजन साळवी यांनी आमदार झाल्यापासून म्हणजेच 2009 पासून आमदार निधीतून आतापर्यंत खर्च केलेल्या निधीची आणि कामांची माहिती जिल्हा नियोजन विभागाकडे रायगड एसीबीने मागविली, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली होती.


माहिती काय मागविली : सन 2009 पासून आजपर्यंत आमदार श्री. राजन प्रभाकर साळवी यांच्या आमदार निधीतून किती निधी खर्च करण्यात आला, याची वर्षनिहाय माहिती पुरविण्यात यावी. वर्षनिहाय आमदार निधीतून करण्यात आलेल्या कामांची यादी मागविण्यात आली. कामाचा ठेका देण्यात आलेल्या ठेकेदाराचे पुर्ण नांव व पत्ता तसेच कामाची अंदाजित रक्कम मागविण्यात आली. ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिल्याची तारीख, ठेकेदाराने काम पुर्ण केल्याची तारीख, ठेकेदाराला कामाचे बिल अदा केल्याची तारीख याची देखील माहिती मागविण्यात आली.



हेही वाचा : Rajan salvi : ठाकरे गटाला दणका ! आज राजन साळवी चौकशीसाठी एसीबी कार्यालयात राहणार हजर

Last Updated : Mar 6, 2023, 9:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.