ETV Bharat / state

'पत्र लिहिण्यापेक्षा राज्य आणि केंद्राकडून नुकसानग्रस्त भागाकरिता धोरण तयार करण्यासाठी प्रयत्न करणार'

author img

By

Published : Jun 9, 2020, 8:25 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी आज (मंगळवार) रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.

sharad pawar
शरद पवार

रायगड - निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यानंतर या भागाचा दौरा केला. आज (मंगळवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दोन दिवसाचा कोकण दौरा करत असून आज ते रायगड दौैऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आणि नुकसानग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.

नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर माणगाव प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना, 'प्रदेशात झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन याबाबत राज्य आणि केंद सरकारकडे धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणार' असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार यांची पत्रकार परिषद...

हेही वाचा... कीटकनाशकांवरील बंदीवर आंबा बागायतदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया

रायगड जिल्ह्यातील बागायतदार हा पुढील हा दहा वर्षे आपल्या उत्पन्नपासून दुरावला आहे. हेक्टरी मदत न देता झाडांच्या संख्येनुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याची माहिती यावेळी शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवारपासून नुकसानग्रस्त भागात विनामूल्य अन्नधान्य वितरित केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा त्वरित सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. चक्रीवादळाने नुकसान झालेल्या घराच्या घरबांधणीसाठी शासनाने मदत करावी. तसेच स्वतःचे घर आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी घरमालकाला रोजगार हमीतून निधी मिळवुन देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

घराच्या नुकसानी पंचनामा करताना घरातील अन्नधान्य आणि इतर वस्तूचेही पंचनामे त्यासोबत करणे गरजेचे असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. केंद्राकडे आणि राज्याकडे घेतलेल्या आढाव्याची माहिती देण्यात येणार असून त्यासाठी धोरण निश्चित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सरकार जर सर्कस असेल तर आम्हाला एक विदुषकाची गरज...

केंद्रीय मंत्री राजनाथ सिह यांनी सोमवारी झालेल्या महाराष्ट्र जनसंवाद या व्हर्च्युअल र‌ॅलीमध्ये राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी बोलताना, महाराष्ट्रात सरकार आहे की सर्कस असे म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी, आमच्याकडे सर्कसमधील प्राणी आहेत. फक्त विदूषकाची गरज असल्याचे सांगितले. पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा उडाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.