ETV Bharat / state

Dagdusheth Temple Administration Appeal : जास्तीत जास्त ऑनलाईन दर्शन घ्या; दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रशासनाचं आवाहन

author img

By

Published : Jan 9, 2022, 1:15 PM IST

Updated : Jan 9, 2022, 7:21 PM IST

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रशासनाकडून ( Shrimant Dagdusheth Halwai Temple Administration ) शासनाने दिलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. भाविकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ( Take Online Darshan Appeal By Dagdusheth Temple Administration )

Dagdusheth Temple
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रशासन

पुणे - देशासह राज्यात देखील ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसंदिवस वाढ होताना दिसत आहे. ( Omicron Patients Increasing in Maharashtra ) त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या माध्यमातून वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ( Guidelines issued by MH Government over Omicron ) राज्यासह शहरातही मंदिर प्रशासन हे जागृत झाले आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर प्रशासनाकडून ( Shrimant Dagdusheth Halwai Temple Administration ) शासनाने दिलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. भाविकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ( Take Online Darshan Appeal By Dagdusheth Temple Administration )

ईटीव्ही भारत प्रतिनिधीचा आढावा

विना मास्क मंदिरात प्रवेश नाहीच -

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासाहित विविध संस्था संघटनेच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुरुवातीलाच भाविकांची थर्मल स्कॅनिंग तसेच सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला जात आहे. विना मास्क भाविकांना दर्शनासाठी आत सोडले देखील जात नाही आहे. शासनाने जी काही नियमावली दिली आहे त्याचा वापर मंदिर प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी मंदिर प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - Plastic Free Pimpri Chinchwad Initiative : प्लॅस्टिक बाटल्या द्या अन् चहा, वडापाव मिळवा.. पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना

शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ -

पुणे शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या संख्येने दिसून येत आहे. शहरात मागील 3 दिवसांपासून दररोज 2000 हुन अधिक रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यासह शहरात देखील चिंतेचा वातावरण निर्माण झाले आहे.

Last Updated : Jan 9, 2022, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.