ETV Bharat / state

Pimpri Chinchwad fire : पिंपरी-चिंचवडमध्ये एकापाठोपाठ स्फोट, चार स्कूल बस जळून खाक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 7:41 AM IST

Updated : Oct 9, 2023, 9:00 AM IST

Pimpri Chinchwad fire : पिंपरी-चिंचवड परिसरातील ताथवडे येथे एका टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. आग लागल्यानं मोठे स्फोट होऊन हवेत आगीचे लोट उठले. त्यामुळं मोठी आग लागल्याचे समोर आलं आहे. ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालया लगतच ही घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Pimpri Chinchwad fire
पिंपरी-चिंचवड परिसरातील ताथवडे येथे एका टँकरला भीषण आग लागली

पिंपरी-चिंचवड परिसरातील ताथवडे येथे एका टँकरला भीषण आग

पुणे (पिंपरी-चिंचवड) Pimpri Chinchwad fire : पिंपरी- चिंचवडमधील ताथवडे येथे जेएसपीएम विद्यालयाच्या परिसरात अचानक तीन ते चार स्कूल बसला आग लागल्यानं मोठे स्फोट घडले आहेत. यामुळे नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. या घटनेत चार स्कूल बस आणि एक टँकर जळल्याची माहिती समोर आली आहे. स्कूलबस या गॅसवरील असल्यानं मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तसंच आता आग आटोक्यात आली असून कुलिंग ऑपरेशन करण्यात आलं.


स्फोटाच्या आवाजानं परिसरात एकच खळबळ उडाली : या घटने संदर्भात अधिक माहिती अशी की, ताथवडे येथे साधारण ११.३० ते ११.४५ चा सुमारास एका टँकरला भीषण आग लागली. टँकरमध्ये नेमकं काय होत हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यानंतर बाजूलाच पार्क केलेल्या स्कुल बस मध्ये आग लागली. स्कूल बस गॅस किटवर असल्यानं तीन ते चार स्फोट झाले. काहीवेळ एकामागोमाग स्फोटाचा आवाज आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. जेएसपीएम कॉलेजमधील हाॅस्टेलमध्ये राहणारी अनेक मुलं रस्त्यावर उतरले. या घटनेनंतर काही वेळ या भागात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश : घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तसंच त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, परिसरात शाळा आणि हाॅस्टेल असल्यानं येथं नेहमी वर्दळ असते. त्यामुळं हीच घटना जर सकाळी घडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

अवैधरित्या गॅस भरण्यात येत असल्याचा संशय- मे. तिरूपती करियर चे 21 टन क्षमतेच्या प्रोपिलीन गॅस असलेले बुलेटमधून अवैधरित्या गॅसचा भरणा घरगुती 14.2kg आणि कमर्शियल सिलेंडरमध्ये करण्यात येत असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवैधरित्या गॅस भरताना गॅसची गळती झाल्यानंतर आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग लागल्यानंतर भीतीपोटी कार्यरत असलेले खासगी कंपनीचे कर्मचारी घटनास्थळापासून पळून गेले असावेत. त्यामुळे घटनास्थळी कोणीही जखमी अवस्थेत आढळून आले नाहीत. घटनास्थळी 9 फुटलेले, 10 भरलेले तर इतर मिळून एकूण 27 सिलेंडर होते. घटनास्थळी सिलेंडरचे मोठे स्फोट होत असल्याचं समजताच पिंपरी, थेरगाव, प्राधिकरण, राहटणी, चिखली, भोसरी, तळवडे अग्निशमन पथके त्याचप्रमाणे हिंजवडी MIDC आणि PMRDA ची पथकेदेखील मदतीस धावून आले होते.

हेही वाचा :

  1. Pune Murder News : खून करून पोलीसांनी पकडू नये म्हणून आरोपीनं लढविली अनोखी शक्कल; पाहून पोलीसही चक्रावले
  2. Simba and James in Police Force: गुन्हेगारांनो सावधान! पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात आता 'सिम्बा आणि जेम्स' उलगडणार गुन्हे
  3. Pune Crime News : पिंपरी चिंचवड शहरात भर दिवसा गोळीबार; तरुणाचा मृत्यू
Last Updated : Oct 9, 2023, 9:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.