ETV Bharat / state

Protest Against Governer : काळी टोपी गुजरातला पाठवा ; पुण्यात माजी महापौर संघटनेच्यावतीने राजभवनाबाहेर आंदोलन

author img

By

Published : Dec 5, 2022, 1:03 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राज्यपालांविरोधात राज्यभर संतापाची लाट (Protest against governer controversial statment) उसळली. याच पार्श्वभूमीवर माजी महापौर उपमहापौर संघटनेच्या वतीने पुण्यात राजभवनाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपाल हटवा अशी मागणी करण्यात (former mayors association Protest In Pune) आली.

Protest Against Governer
पुण्यात माजी महापौर संघटनेच्या वतीने राजभवनाबाहेर आंदोलन

पुणे : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमान केल्यानंतर (controversial statment about Shivaji Maharaj) राज्यभर राज्यपाल यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. आज पुण्यातील माजी महापौर उपमहापौर संघटनेच्या वतीने राजभवन बाहेर आंदोलन करत काळी टोपी गुजरातला पाठवा, राज्यपाल हटवा अशा घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले (Protest against governer) आहे.


तीव्र आंदोलन : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमान केल्यानंतर राज्यभर राज्यपाल यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. राज्यपाल हे सातत्याने राज्यात महापुरुषांच्या बाबतीत अवमानकारक शब्द काढत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत देखील त्यांनी अशाच पद्धतीने अवमान करणारा शब्द वापरला आहे. आत्ता राज्यपाल यांना राज्याच्या राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी यावेळी या माजी महापौर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनात तब्बल 15 ते 16 माजी महापौर उपस्थित (Protest against governer controversial statment) होते.

पुण्यात माजी महापौर संघटनेच्या वतीने राजभवनाबाहेर आंदोलन


महापौर उपस्थित : राजभवन बाहेर माजी महापौर संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या यांना भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर दत्ता गायकवाड हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील यावेळी राज्यपाल हटवा, अशी मागणी केली. तसेच कोणीही जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द काढत असेल तर तो मूर्ख माणूस असल्याचे देखील सांगितले (former mayors association Protest In Pune) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.