ETV Bharat / state

आंबेगाव तालुक्यात 'कांदा' चोरट्यांचा धुमाकूळ

author img

By

Published : Sep 29, 2019, 5:11 PM IST

सध्या कांद्याचे बाजारभाव तेजीत आल्याने साठवणुकीत ठेवलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी काढत आहेत. बाजार समितीमध्ये कांद्याला तीनशे ते साडेतीनशे दर मिळत आहेत. या कांद्यावर चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले असून कांद्याची चोरी होत आहे.

कांदा साठवण्याची चाळी

पुणे - आंबेगाव तालुक्यात चोरांनी कांदा चोरीचे सत्र सुरू केले आहे. अवसरी टाव्हरेवाडी येथील दत्तात्रय टाव्हरे यांच्या साठवणुकीतील दहा कांद्याची पोती चोरीला गेल्याची घटना घडली.

कांद्याचे बाजारभाव तेजीत असल्याने कांद्याची चोरी होत आहे


शुक्रवारी दिवसभरात 10 पोती कांदा भरून दत्तात्रय टाव्हरे सायंकाळी घरी गेले. शनिवारी व्यापारी कांदा खरेदीसाठी येणार होता. शनिवारी संध्याकाळी ते आपल्या कांदा चाळीमध्ये कांदा पाहण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना कांद्याच्या भरून ठेवलेल्या दहा पिशव्या गायब असल्याचे लक्षात आले.

हेही वाचा - दाटले हे धुके.. उत्तर पुणे भागाला पांढऱ्या शुभ्र धुक्याची मिठी !

गेल्या काही दिवसांपासून दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव तेजीत आल्याने साठवणुकीत ठेवलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी काढत आहेत. बाजार समितीमध्ये कांद्याला तीनशे ते साडेतीनशे दर मिळत आहेत. या कांद्यावर चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले असून कांद्याची चोरी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घराची राखण करावी की कांदा चाळीची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Intro:Anc_आंबेगाव तालुक्यात घरफोडी,व दुकांनांमध्ये चोरी करणाऱ्या चोरांनी आता कांदा चोरीचा सत्र सुरु केले असुन अवसरी टाव्हरेवाडी येथील दत्तात्रय टाव्हरे यांच्या साठवणुकीतील दहा कांद्याची पोती चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी घडली असुन टाव्हरे यांनी आज मंचर पोलीसांत तक्रार दाखल केली आहे

गेल्या काही दिवसांपासुन दुष्काळी परिस्थिती अवकाळी पाऊस,वातावरणातील बदलामुळे शेतमालाचे मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असताना सध्या कांद्याचे बाजारभाव तेजीत आल्याने साठवणुकीत ठेवलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी काढत असताना आता या कांद्यावर चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले असुन कांद्याची चोरी होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घराची राखण करावे की कांदा चाळीचे असा प्रश्न निर्माण झाला आहे

टाव्हरे यांनी शुक्रवारी दिवसभरात 10 पोती (600 किलो) कांदा भरून दरवाजा बंद करून सायंकाळी घरी गेले होते त्यांच्या कांदा चाळीत सुमारे दोनशे पोती कांदा असून भरलेला कांदा विक्रीस पाठवला होता शनिवारी व्यापारी कांदा खरेदीसाठी येणार होता त्यामुळे शनिवारी संध्याकाळी ते आपल्या कांदा चाळीचे दरवाजा उघडून कांदा पाहण्यासाठी गेले असतात त्यांना त्याठिकाणी कांद्याच्या भरून ठेवलेल्या दहा पिशव्या गायब असल्याचे दिसले त्यात त्यांच्या अंदाजे 22 ते 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे

दरम्यान बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला तीनशे ते साडेतीनशे एवढा दर मिळत असून कांद्याला सध्या चांगले दिवस असल्यामुळे शेतकरीवर्ग साठवणूक केलेला कांदा विक्रीस काढत आहे मात्र चोरट्यांच्या भीतीने आता कांद्याची राखण कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे

Byte__अंकुश टाव्हरे__शेतकरी

Byte_दत्तात्रय टाव्हरे _शेतकरीBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.