ETV Bharat / state

Case On Ganesh Bidkar : पैसे वाटप आणि मारहाण प्रकरणी भाजप नेते गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 27, 2023, 11:35 AM IST

कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. सत्ताधारी विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना, भाजपचे नेते गणेश बिडकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्या आरोप केला. त्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kasba by poll election
कसबा पोटनिवडणूक

पुणे : पुण्यातील मालधक्का चौक येथे भाजपचे नेते गणेश बिडकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. असे आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी समर्थ पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी तक्रार देखील दाखल केली. काल रविवारी झालेल्या या मारहाणी प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशन येथे भाजप नेते गणेश बिडकर यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्य लोकांवरही गुन्हा : समर्थ पोलिसांनी या प्रकरणी गणेश बिडकरसह मयूर चव्हाण, नईम शेख, बाला शेख, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा समर्थ पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्यांना मारहाण झालेली आहे असे फैयाज शेख यांनी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदारासह मित्राला मारहाण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. तक्रारदार हे मालधक्का चौक भागात त्यांचा मित्र याकूब बशीर शेख यांच्यासह फिरत असताना त्यांना काही भाजप कार्यकर्ते हे आएशा कॉम्पलेक्सजवळ पैशाचे वाटप करीत आहेत अशी माहीती मिळाती होती. खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले होते. तेव्हा भाजपाचे नगरसेवक गणेश बिडकर, मयूर चव्हाण, नईम शेख, बाला शेव हे उभे असल्याचे दिसले. त्यांच्या हातामध्ये केशरी रंगाची पिशवी तसेच मतदारांच्या स्लिप दिसल्या. तक्रारदार व त्यांचा मित्र याकुब शेख यांना शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली.

काँग्रेसचे ठिय्या आंदोलन : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. तेव्हा बिडकर यांनी आमच्यावर हल्ला करत आम्हाला मारहाण केली आहे. बिडकर हे जेव्हा मारहाण करत होते तेव्हा तिथे पोलीस कर्मचारी हे देखील उपस्थित होते. त्यांच्या समोर हा प्रकार घडला आहे. आमची मागणी आहे की बिडकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यांच्याकडून समर्थ पोलीस स्टेशन येथे ठिय्या देखील मांडण्यात आला. यावर बिडकर म्हणाले की. आमचे कार्यकर्ते हे एका कार्यकर्त्याच्या घरी बसले होते. तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते हे तिथे आले होते. कार्यकर्त्यांची भांडणे सुरू आहेत. म्हणून मी मध्ये गेला आणि भांडण सोडवले. पण माझाच व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यात आला. काँग्रेसकडून जे आरोप करण्यात येत आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही मारहाणीची संस्कृती आमची नाही. ही संस्कृती काँगेसची आहे. उलट त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केली, मी देखील पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. असे देखील बिडकर म्हणाले.

हेही वाचा : Bada Hanuman Mandir Beed: बीड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला बडा हनुमान; जाणून घ्या काय आहे ख्याती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.