ETV Bharat / state

J P Nadda Pune Visit: मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर 'हे' नाव एकत्र कोणी घेत नाही - जे पी नड्डा

author img

By

Published : May 18, 2023, 8:38 PM IST

Updated : May 18, 2023, 9:45 PM IST

पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे गुरुवारी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यातील पक्षाचे नेते, मंत्री, आजी-माजी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी राज्यातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात आले. यावेळी जे पी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.

JP Nadda News
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा

सभोत बोलताना जे पी नड्डा

पुणे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 नंतर वेगवेगळ्या देशात गेले. अनेक विदेशातील देशाचे दौरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याआधी 20 20 वर्ष काँग्रेसचे पंतप्रधान नेपाळला गेले नाही. शेजारील देश श्रीलंका येथे देखील गेले नाही. पण आज जर नेपाळ मध्ये भूकंप आला तर नेपाळच्या सरकारच्या आधी भारत सरकार मदतीला पोहचत आहे. हे बदल आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यावर पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर 2014 आधी विदेशातील देश हे नेहेमी भारत आणि पाकिस्तान यांच्या बाबत बोलत होते. युरोप मधील देखील असे बोलत होते. दोन्ही देशांना एकत्र समजत होते. पण 2014 नंतर कोणीही भारत नाव पाकिस्तानशी जोडत नाही. भारत खूप पुढे निघून गेला आणि पाकिस्तान तिथच राहिला असे यावेळी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सांगितले.


पदाधिकारी यांना केले मार्गदर्शन: पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे आज राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यातील पक्षाचे नेते, मंत्री आजी माजी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी राज्यातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात आले.



भारत देशाची सकारात्मक प्रतिमा: यावेळी जे पी नड्डा म्हणाले की, आजच्या या प्रदेश कार्य समितीच्या माध्यामातून एक विजयाचा विश्वास घेऊन जाणार आहे. जगात कोठेही आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाल्यास भारत देश हा नेहमी मदतीचा हात देतो. हा मदतीचा हात देण्यास प्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही कमतरता केली नाही. जागतिक पातळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारत देशाचे एक वेगळी अशी सकारात्मक प्रतिमा करून ठेवलेली आहे. काँग्रेसमधील काही नेते महागाई बाबत अनेक वेळा भाजपवर प्रश्न उपस्थित केले.

जगात कोठेही आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाल्यास भारत देश हा नेहमी मदतीचा हात देतो. हा मदतीचा हात देण्यास प्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही कमतरता केली नाही. - भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

भाजपने विविध विकास कामे केली: भाजपकडे विकासाची दृष्टी आहे. आपल्या राज्यात भाजप सरकारने मूलभूत आणि शहरे जोडण्याकरता हजारो कोटी रुपयांची विविध विकास केलेली आहे. वंदे भारत ही ट्रेन भविष्याची दृष्टी घेऊन जाणारी ट्रेन आहे. 38 हजार कोटींची योजना ही एकट्या मुंबई सुरू आहेत. देशातील नागरिकांना भाजपचे कार्यकर्ते यांच्याकडून विविध अपेक्षा आहे, याकरता कार्यकर्त्यांनी संयम आणि संवादाची भूमिका घेण्याची गरज आहे. असे यावेळी नड्डा म्हणाले.



ठाकरेंच्या शिवसेनेचा शिल्लक सेना उल्लेख: यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवीन टीम घोषित केल्यानंतर पहिली राज्य कार्यकारणी होत आहे. आमच्या सरकारला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर नड्डा जी आलात त्यासाठी आपले स्वागत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ही काही जणांचे तोंड सुरु आहेत. राजाचा आवडता पोपट जसा मेला तस, उद्धवजी याना पोपट मेला अस कुणी सांगतच नाही. तसेच यावेळी फडणवीस यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा शिल्लक सेना म्हणून उल्लेख देखील करण्यात आला आहे.



पुन्हा निवडून येणार: सुप्रीम कोर्टात ठाकरेकडून आठ मागण्या होत्या, त्यातील एक ही मागणी मान्य केली नाही. उद्धव ठाकरे म्हणातात जा गावोगावी आणि आपला निर्णय सांगा. तुमच्या मनात कोणतेही शंका ठेवू नका आता पोपट मेला आहे. हे सरकार पूर्णपणे बहुमत आणि कायदेशीर आहे. पुढील आपला कार्यकाळ पूर्ण करणार आणि पुन्हा निवडून येणार हा शब्द आहे.


कर्नाटक पॅटर्न चालणार नाही: मायक्रो मॅनेजमेंट करणे आपल्याला खूप गरजेचे आहे. कर्नाटकात आपला पराभव झाल्यानंतर अनेकजणांना उकळ्या फुटल्या. आपल्याच घरी मुलगा जन्माला अस काही जण वागले. ज्यांच्या एक ही उमेदवार जिंकला नाही ते आनंद साजरा करु लागले आहेत. आता हे म्हणातत, कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार. लोकसभेला कर्नाटक आपण २५ जागा जिंकून आणू आणि तुम्ही किती ही लांगुन चलन करा. तुमचा कर्नाटक पॅटर्न चालणार नाही. इथे फक्त मोदी पॅटर्न, इथे फक्त भाजप पॅटर्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचाच पॅटर्न चालणार असल्याचे यावेळी फडणवीस म्हणाले.

हेही वाचा -

  1. J P Nadda On Skill Development युवकांसाठी कौशल्य विकास ही काळाची गरज जे पी नड्डा
  2. Eknath Shinde On JP Nadda जे पी म्हणजे जबान के पक्के मुख्यमंत्र्यांनी नड्डांचे केले कौतुक
  3. Vikas Kumbhare Fake Call जे पी नड्डा यांना सर्व प्रकरणाची माहिती देणार विकास कुंभारे
Last Updated : May 18, 2023, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.