Ishrat Jahan Encounter Book In Pune: 'इशरत जहाँ एन्काऊंटर'वर पुस्तक प्रकाशन वादाच्या भोवऱ्यात, पहा काय आहे पुस्तकात
Updated on: Jan 24, 2023, 5:21 PM IST

Ishrat Jahan Encounter Book In Pune: 'इशरत जहाँ एन्काऊंटर'वर पुस्तक प्रकाशन वादाच्या भोवऱ्यात, पहा काय आहे पुस्तकात
Updated on: Jan 24, 2023, 5:21 PM IST
मुंब्रा येथील राहणारी इशरत जहाँ (वय वर्ष 21) या मुलीचा तिच्या साथीदारांसोबत गुजरातमध्ये 2004 साली एन्काऊंटर करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा आरोप करीत त्या सर्वांचा एन्काऊंटर झाल्याची घटना जगप्रसिद्ध आहे. यावर आता मुंबईमध्ये राहणारे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी पुस्तक लिहिले आहे. आज (मंगळवारी) प्रकाशन होणार आहे. यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे : इशरत जहाँ प्रकरणावर हे पुस्तक असून याच प्रकाशन आज पुण्यात माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील, कायदेतज्ज्ञ आसिम यांच्या हस्ते होणार आहे. हे पुस्तक फेक एन्काऊंटरचा भंडाफोड करणारे पुस्तक असून 'इशरत जहाँ एन्काऊंटर' या नावाने हे पुस्तक असल्याचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी म्हटले आहे. 2006 सिरीयल बॉम्बस्फोटाच्या खोट्या केसमध्ये नऊ वर्षे तुरुंगात राहून कोर्टातून निर्दोष सिद्ध झालेले मुंबई येथील पुस्तकाचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
वादग्रस्त कार्यक्रमामुळे हॉल रद्द : 'या पुस्तकात मी खरी परिस्थिती वापरली आहे. इशरत जहाँ हिला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे. हा पूर्णपणे फेक एन्काऊंटर असल्याने मी हे पुस्तक लिहिले आहे. आता हे पुस्तक उर्दू भाषेत असून लवकरच मराठी आणि हिंदीमध्ये देखील हे पुस्तक येणार आहे', असे यावेळी लेखक वाहिद शेख यांनी म्हटले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ, पुणे येथे होणार आहे. व्यवस्थापकाने भाडे स्वीकारले व तशी हॉल आरक्षित केल्याची भाडे पावती दिली. या प्रकाशन सोहळा बाबत उपस्थित राहणारे माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, सेवानिवृत्त आयजी एस.एम. मुश्रीफ आणि अन्य वक्त्यांची माहिती खडक पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांना समक्ष भेटून देण्यात आली. तसा अर्जही त्यांनी स्वीकारला. पण, अचानक रविवारी सकाळी हॉलची देखरेख करणारे महापालिका कर्मचारी कोडीतकर यांनी तुमचे पुस्तक सेन्सिटिव्ह आहे. पुस्तक प्रकाशनासाठी तुम्हाला दिलेला हॉल तो आम्ही रद्द करीत आहोत. कृपया आपण आपले पैसे घेऊन जावे, असे सांगितले असे यावेळी मूल निवासी मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले स्मारकाच्या गेटसमोर पुस्तक प्रकाशन : याआधी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला देखील आजम कॅम्पस, पुणे या ठिकाणी अर्ज केला होता. तसे कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका, हॅंडविल, पोस्टर्स, सोशल मीडिया व्हाट्सअपच्या माध्यमातून लोकांना या सोहळ्याची माहिती देण्यात आली होती. त्याही ठिकाणी अचानकपणे प्रकाशन सोहळा आजम कॅम्पस येथील व्यवस्थापकाने रद्द करण्यात आला. त्यानंतर आयोजकांनी सावित्रीबाई फुले स्मारक या ठिकाणी धाव घेतली आणि कायदेशीररीत्या हॉल बुक केला. पुस्तक वादग्रस्त असल्याची माहिती आजम कॅम्पस येथील हॉल देखरेख करणाऱ्यांनी दिली. तर जशीच्या तशीच माहिती सावित्रीबाई फुले स्मारक येथील व्यवस्थापकाने दिली आहे. अचानकपणे दोन दोन हॉल रद्द झाल्याने आयोजकांना प्रश्न निर्माण झाले आहे की, 2004 साली झालेल्या गुजरात फेक एन्काऊंटरची माहिती देणारी पुस्तक पुण्यात प्रकाशित होऊच नये, असा दबाव कोण आणत आहे? कुणाच्या सांगण्यावरून हॉलमध्ये होणारे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत, असा प्रश्न देखील आयोजकांनी केला. त्यांनी विरोध केला तरी सावित्रीबाई फुले स्मारकाच्या गेटसमोर मांडी घालून कार्यकर्ते बसतील आणि त्या पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम आम्ही करू असे यावेळी आयोजकांनी सांगितले आहे.
हेही वाचा : Earthquake Hits Nepal: नेपाळमध्ये मोठा भूकंप, राजधानी दिल्लीतही भूकंपाचे जोरदार झटके.. लोकांमध्ये घबराट
