ETV Bharat / state

Andheri byelection : अंधेरी पोटनिवडणूकीत नोटांना जास्त मतदान, भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले...

author img

By

Published : Nov 6, 2022, 1:16 PM IST

अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल (Andheri byelection result) आज लागत असून आजच्या निकालात मोठ्या प्रमाणात नोटाना मतदान करण्यात आले आहे. हे मतदान भाजपने केले आहे.

Andheri byelection result
भाजप नेते चंद्रकांत पाटील

पुणे : अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल (Andheri byelection result) आज लागत असून आजच्या निकालात मोठ्या प्रमाणात नोटाना मतदान करण्यात आले आहे. हे मतदान भाजपने केले आहे. अशी टीका देखील होत आहे. यावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की कोणी कोणावर काय आरोप करावे यावर बंधने आणता येत नाही. लोकांना वस्तुस्थिती माहिती आहे म्हणून यावर काहीही बोलू नये. तसेच तिथल्या मतदारांची काय मानसिकता आहे हे देखील मला माहित नाही असे यावेळी पाटील म्हणाले.


सर्किट हाऊस येथे बैठकीचे आयोजन : पुण्यातील सर्किट हाऊस येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की नाना पटोले यांना आत्ता हळूहळू लोक गांभीर्याने घेणे बंद करणार आहे.पुढे जाऊन लोक म्हणतील कोण नाना पटोले, असे यावेळी पाटील म्हणाले.

भाजप नेते चंद्रकांत पाटील


निधी मिळेल तसे ती कामे यादीत घेण्यात येणार : मागच्या आठवड्यात जिल्हयाच्या बैठकीत अनेक नेत्यांचा निधी हा कट झाले आहे. यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्या लोकांना कमी निधी मिळाला आहे.अशा लोकांच्या याद्या हे फायनल झाल्या आहेत. मी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे यांचे निधी कमी केले आहे. जस जस निधी मिळेल तसे ती कामे यादीत घेण्यात येणार आहेत,अस देखील यावेळी पाटील म्हणाले


निवडणुकाजवळ आल्या की कामाला लागा : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज भाजपच्यावतीने जागर केले जात आहे. यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की भाजपचे कार्यकर्ते हे नेहेमी तीन प्रकारच्या मुड मध्ये असतात. पाहिले म्हणजे लोकांची सेवा, संघर्ष आणि निवडणुका हे काम करत असतात. आम्हला निवडणुकाजवळ आल्या की कामाला लागा हे आमच्यासाठी नवीन नाही. अस देखील यावेळी पाटील म्हणाले.


विरोधी पक्ष म्हणून अजित दादा रस्त्यावर उतरले : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आजारी असताना ही चिंतन शिबिरात आले .यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच संघर्ष हा डीएनएत नाही. त्याला डीएनए असावा लागतो. स्वभाव असावा लागतो. नुसत्या वल्गना करून काहीही होत नाही. आम्ही जो संघर्ष केला. तो खरा संघर्ष आहे. आत्ता विरोधी पक्ष म्हणून अजित दादा रस्त्यावर उतरले आणि अमरण उपोषणाला बसले. अस बघण महाराष्ट्राला आवडेल. असे देखील यावेळी पाटील म्हणाले.


पाटील यांनी लगावला राष्ट्रवादी काँग्रेसला टोला : धनंजय मुंडे यांनी जो 100 आमदारांबाबत विधान केला आहे. त्याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की कल्पना करणे काही चुकीचे नाही पण ते वास्तव्यात आणणे महत्वाचे असते. भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा अशी विधाने केली तेव्हा ती वास्तव्यास आणून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही 60 च्या पुढे आमदारांची संख्या करता आली नाही. जे 60 ते 70 च्या पुढे कधी गेले नाही ते काय वल्गना करत आहे. असा टोला देखील पाटील यांनी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.