ETV Bharat / state

Husband Raped On Wife : बंदुकीचा धाकाने हॉटेल वैशालीची घेतली मालकी; ड्रग्स देऊन विवाहितेवर बलात्कार, गुन्हा दाखल

author img

By

Published : Jun 19, 2023, 4:12 PM IST

पुण्यातील वैशाली हॉटेलची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी बंदुकीच्या धाकावर करुन घेतल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. यावेळी पतीने दारु आणि ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचा आरोपही या पीडितेने केला आहे.

Husband Raped On Wife
हॉटेल वैशाली

पुणे : शहरातील प्रसिद्ध हॉटेलपैकी एक असलेल्या पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली हे बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप एका विवाहितेने केला आहे. इतकेच नाही तर लग्नाआधी पतीने स्वतःच्या घरी घेऊन जात दारू आणि ड्रग्स देऊन बलात्कार केल्याचा आरोपही या विवाहितेने केला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : जून 2018 ते आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या विवाहितेच्या सासू सासरे, पती, दीर, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 34 वर्षीय विवाहितेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

दारु आणि ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरिक संबंध : याप्रकरणी अधिक माहिती अशी की विवाहितेच्या पतीने पीडित विवाहितेला 2018 मध्ये घुले रोड येथील राहत्या घरी नेले होते. यावेळी पतीने सदर विवाहितेला दारु व ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. इतक्यावरच न थांबता आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून पीडितेकडून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतली. पीडितेच्या कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या चार महागड्या कार त्याने परस्पर विकल्या. तसेच पीडितेचे एक कोटी 70 लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या कार आरोपी पती आणि त्याचा भाऊ वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा -

Tourist Girl Raped In Shimla : शिमला फिरायला गेलेल्या मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर टॅक्सी चालकाचा बलात्कार

  1. Rape Case Nanded: लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार, नांदेडमध्ये गुन्हा दाखल
  2. Minor Girl Rape : अल्पवयीन युवतीवर 50 वेळा सामूहिक अत्याचार, औरंगाबादच्या बलात्कार प्रकरणात नवीन खुलासा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.