ETV Bharat / state

ZP's first group school : 16 शाळांचं एकत्रिकरण करून जिल्हा परिषद याठिकाणी साकारतेय झेडपीची राज्यातील पहिली समूह शाळा

author img

By

Published : Apr 26, 2023, 4:34 PM IST

राज्यातील कमी पटसंख्येच्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु करताच या निर्णयाला कडाडून विरोध करण्याची भूमिका शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी जाहीर केली होती. अशातच पुणे जिल्ह्यात ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, त्याची माहिती घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा शाळेची माहिती घेते. शाळा बंद न करता त्या सर्व शाळांचे एकत्रीकरण करून एक चांगली शाळा सुरू करण्यात येणार आहे.

ZP's first group school
आयुष प्रसाद

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून क्लस्टर स्कूल (समूह शाळा) असे नवीन पर्याय सुरू करण्यात आले असून राज्यातील पहिली क्लस्टर स्कूल ही पुणे जिल्ह्यातील पानशेत (ता. वेल्हे) येथे सुरू करण्यात येत आहे.

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून क्लस्टर स्कूल (समूह शाळा) असे नवीन पर्याय सुरू करण्यात आले असून राज्यातील पहिली क्लस्टर स्कूल ही पुणे जिल्ह्यातील पानशेत (ता. वेल्हे) येथे सुरू करण्यात येत आहे.


16 शाळांना एकत्रित करून समूह शाळा : पुणे जिल्ह्यातील पानशेत व पानशेतमधील आजूबाजूच्या परिसरातील ज्या शाळांची पटसंख्या ही 20 च्या आत आहे, अशा 16 जिल्हा परिषद शाळा या समूह शाळा प्रकल्पात निवडण्यात आल्या आहेत. याच प्रकल्पासाठी पानशेतमध्ये मोठी इमारत उभारण्यात आली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून ही शाळा सुरु होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जास्त मुलांसोबत शिक्षण घेण्याबरोबरच शैक्षणिक गुणवतेत वाढ होण्यासाठीही मदत होणार आहे.



सव्वा कोटी रुपयांचा निधी : याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत क्लास नंबर 7 मध्ये समूह शाळा स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे. यावरून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पानशेत मध्ये 16 शाळांना एकत्रित करून समूह शाळा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत जानकीदेवी बजाज फाउंडेशनने सव्वा कोटी रुपयांचा निधी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उपलब्ध करून दिला आहे तर फोर्स मोटर्सच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दोन बसेस देण्यात आल्या आहे. या समूह शाळेत जवळपास 150 विद्यार्थी शिकणार आहे. जवळपास 10 किलो मिटरच्या आसपासचे विद्यार्थी हे या समूह शाळेत शिक्षण घेणार आहे. या मुलांसाठी शाळेत ये जा करण्यासाठी विशेष अशी बसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.



खर्च विद्यार्थ्यांकडून घेणार नाही : तसेच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या समग्रह शिक्षण विभागाच्या माध्यमातून भत्ता देखील मिळणार आहे. यामुळे खर्च हा विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार नाही. ज्या 16 शाळांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे, त्या शाळांमध्ये 37 शिक्षक होते. पण आत्ता उभारण्यात आलेल्या या शाळांमध्ये वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळे शिक्षक हे शिकवणार आहे. विशेष म्हणजे यासाठी ग्रामस्थांनी विशेष असे सहकार्य केले आहे. पानशेत मधील या 16 शाळांमध्ये गेल्या काही वर्षापासून मुलांची पटसंख्या खूपच कमी होती. एकाच वर्गखोलीत विविध वर्गातील विद्यार्थी हे एकत्र बसून शिक्षण घेत होते. पण आत्ता असे न होता एकाच वर्गातील विद्यार्थी हे एकत्र बसणार आहे.

हेही वाचा : Sharad Pawar on Barsu refinery project : बारसू आंदोलकांना विश्वासात घेतले पाहिजे-शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.