ETV Bharat / state

Pune Crime : क्रेडिट कार्ड काढून देण्याचे सांगत परस्पर ऑनलाईन आयफोनची खरेदी; तरुणीकडून महिलेची फसवणूक

author img

By

Published : Mar 21, 2023, 5:46 PM IST

क्रेडिट कार्ड काढून देण्याच्या नावाने ग्राहकांची होणारी फसवणूक सायबर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली. यामध्ये आरोपी तरुणीने पीडित महिलेला क्रेडिट कार्ड काढून देण्याचे आमीष दाखवून तिच्याकडून ओटीपी क्रमांक जाणून घेतला. अशाप्रकारे महिलेची 3 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले.

Pune Crime
फसवणूक

पुणे: घटनाक्रम असा की, एका महिलेस क्रेडीट कार्ड काढून देते असे सांगून एका भामट्या तरुणीने महिलेच्या कार्डची गाेपनीय माहिती घेतली. यानंतर परस्पर ऑनलाइन सहा आयफाेन खरेदी करत एकूण 3 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आराेपीवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


तक्रार दाखल करण्यात विलंब: प्रतीक्षा अविनाश चाैरे (रा. इंद्रायणीनगर, भाेसरी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. घटनेबाबत पीडिता संगिता हनुमंत गायकवाड (वय-46,रा.पर्वती,पुणे) यांनी पोलिसांकडे आराेपी विराेधात तक्रार दिली आहे. घटना सप्टेंबर 2021 ते ऑक्टाेबर 2021 यादरम्यान घडली. याबाबत तक्रारदार यांनी विलंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.


आयफोन खरेदीसाठी कर्ज: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी प्रतीक्षा चाैरे हिने तक्रारदार संगीता गायकवाड यांना अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या आयडीएफसी बँकेचे क्रेडीट कार्ड काढून देते, अशी बतावणी केली. आरोपीने तक्रारदाराला त्यांच्या माेबाईलवर ओटीपी येईल असे सांगितले. यानंतर आरोपी तरुणीने तो ओटीपी क्रमांक माहीत करून घेत त्यांच्या बँक खात्यातून वेळाेवेळी दाेन लाख 70 हजार रुपये किंमतीचे आयफाेन माेबाईल खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले.

कर्ज घेऊन फसवणूक: तक्रारदार यांचे नावे चार आयफाेन तरुणीने परस्पर खरेदी केली. प्रकरणातील तक्रारदाराचा मित्र अक्षय गायकवाड यांचेकडून घेतलेल्या कागदपत्राचा वापर करून अक्षयच्या नावे दाेन आयफाेन असे एकूण 3 लाख 91 हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली. घटनेचा तपास दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खाेमणे करत आहेत.

बीडमध्ये आर्थिक फसवणूक: बीड जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूक केलेल्या 2 लाख 68 हजार रुपयांचा बीड सायबर पोलिसांनी त्याचा छडा लावून हे पैसे परत केले होते. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील सुनिता प्रवीण जाधव, बीड शहरातील शाहूनगर भागातील लक्ष्मण गुलाबराव वंजारे, तर नरेश बाबुराव शिंदे (रा. चंपावती नगर बीड), चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे (रा. नेकनूर ता. बीड), आशुतोष बाळासाहेब घोडके (रा. बीड) या सर्वांची ऑनलाईन फसवणूक होऊन बँक खात्यातून परस्पर 2 लाख 68 हजार रुपये खात्यातून परस्पर चोरी गेल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती. तक्रारदारांनी सायबर पोलिसांना झालेला प्रकार सांगितला व आठ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला व ज्या व्यक्तींनी तक्रार दिली होती त्या सर्वांना बोलावून त्यांची रक्कम त्यांना मिळवून दिली.

हेही वाचा: Pankaja Munde Video : पंकजा मुंडेंना आता थेट पंतप्रधानपदाचे स्वप्न; म्हणाल्या, एक महिला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.