ETV Bharat / state

Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघात का होतात? रस्ते अपघात तज्ज्ञांनी सांगितले मत

author img

By

Published : Jul 2, 2023, 9:41 AM IST

समृद्धी महामार्गावरील बुलढाणा येथे धावत्या ट्रॅव्हल्सने पेट घेतल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 25 जण जळून मृत्यू पावले. त्यामुळे देशभर याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे, पण नेमका समृद्धी रस्ता आहे? त्या ठिकाणी अपघात का होतात, हे न करण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी ईटीव्ही भारतने रस्ते अपघात तज्ञ तन्मय पेंडसे यांच्याशी संवाद साधला आहे. यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहू या.

Samriddhi Highway Accident
समृद्धी महामार्गावर अपघात

समृद्धी महामार्ग अपघातांवर रस्ते अपघात तज्ञांची प्रतिक्रिया

पुणे : समृद्धी महामार्गाच्या रस्त्याची लांबी 700 किलोमीटर आहे. तो रस्ता चांगला आहे. मला वाटते की रस्त्याच्या उद्घाटनाला घाई झाली. आपल्याकडे रस्त्याचे उद्घाटन करायला खूप घाई होते. त्यामुळे असे अपघात होतात. एवढ्या लोकांचे दुर्दैवी मृत्यू होत असेल तर याचा विचार आता खरेच केला पाहिजे. आपल्यासाठी ही शरमेची गोष्ट आहे. सातशे किलोमीटरचा तो रस्ता आणखी पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आणखी तेवढी वाहतूक त्या ठिकाणी नाही. बऱ्याच वेळा वाहन चालकांना गर्दीमध्ये गाडी चालवायची सवय असते. इथे जास्त वाहतूक नसल्यामुळे वेग मर्यादा तोडली जाते.

साधे आयटीएमएस इंटरवियर ट्राफिक मॉडेल सिस्टम समृद्धीवर का बसवली गेली नाही? शासनालाही शक्य नाही का? याचाही विचार होणे गरजेचे आहे.- रस्ते अपघात तज्ञ तन्मय पेंडसे

रस्ते सुविधांवर लक्ष : महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या रस्त्यावरती कशा प्रकारचे अपघात होतात, हे आपल्याला आता माहिती आहे. ते सर्व बांधून झाल्यानंतर आणि सर्व सुविधा निर्माण झाल्यानंतरच रस्ते वाहतुकीसाठी सुरू केले पाहिजे. अर्धवट ज्यावेळेस आपण सुरू करतो त्यावेळेस असे विषय येतात. 354 अक्सिडेंट झालेले आहेत, त्यात 58 मृत्युमुखी पडलेला डेटा मिळालेला आहे. एवढे जर चांगले रस्ते आहेत, एवढे चांगले प्रयत्न आहेत. कमी वेळत लवकर प्रवास व्हावा, सुखी प्रवास व्हावा यासाठी जर तुम्ही करत असाल तर या सगळ्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.

गाडीचे फिटनेस सर्टिफिकेट : महामार्गावर आज कुठल्याही प्रकारे ट्रामा केअर युनिट नाही. त्या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था असणारे थांबे आजही नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत. वाहन चालक म्हणून गाडीचे फिटनेस सर्टिफिकेट पाहणे महत्त्वाचे आहे. कित्येक वेळेस तो संपलेला असतो. गाडीच्या टायरची हवा चेक केलेली नसते. सर्विसिंग केलेली नसते. या प्राथमिक महत्वाच्या गोष्टी वाहन चालक बऱ्याच वेळेस दुर्लक्षित करतात. त्याचा परिणाम आपल्याला अपघात झालेला दिसतो. तेही अनेक अभ्यासावरून दिसलेले आहे.


वाहतूक शिक्षण गरजेचे : सगळ्यात महत्त्वाचे ट्रॅफिक ही शिक्षण, अंमलबजावणी, आपत्कालीन व्यवस्था आणि अभियांत्रिकी व्यवस्था यावरती वाहतूक व्यवस्थापन अवलंबून असते. यापैकी शिक्षण विषयावर जास्त काम करणे गरजेचे आहे. सुरक्षा सप्ताह सुरक्षा पंधरवडा आहे, तेवढ्यापुरते न होता वर्षभर हे चालू असणे गरजेचे आहे. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये वाहतूक शिक्षणाचा समावेश करणे गरजेचे आहे. भारतात दीड लाख लोक दरवर्षी अपघातात मरतात, असे रस्ते अपघात तज्ञ तन्मय पेंडसे म्हणाले आहेत.

देशाच्या जीडीपीचे नुकसान : जगामध्ये मानवी अपघातामध्ये भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तीन लाख लोकं मरतात. त्यामध्ये 70 टक्के 18 ते 45 या वयोगटामधले असतात. यामुळे देशाच्या युवाशक्तीवर खूप मोठा आघात होतो. आपले खूप मोठे नुकसान होते. देशाच्या जीडीपीचे सुद्धा नुकसान होते. शासन आणि वाहन चालक या दोघांची ही जबाबदारी आहे. शासन त्यांना जे आवश्यक आहे, ते सहज करू शकतात. सामान्य लोक करू शकत नाहीत, ते केले पाहिजे.
हेही वाचा :

  1. Buldhana Bus Accident: अपघातातील मृतांवर बुलढाण्यात सकाळी 9 वाजता होणार सामूहिक अंत्यसंस्कार, 5 स्वर्ग रथाद्वारे नेण्यात येणार मृतदेह
  2. Shivendra Raje Bhosale News: समृद्धीच्या अपघातावरून राजकारण करणे योग्य नाही, अपघाताची चौकशी देखील झाली पाहिजे- शिवेंद्रराजे भोसले
  3. Raj Thackeray Letter To PM : '...तर मोदी सरकार जबाबदार; राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.