ETV Bharat / state

Padalkar Vs Awhad: आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार...गोपीचंद पडळकर

author img

By

Published : Jan 4, 2022, 1:16 PM IST

Updated : Jan 4, 2022, 7:25 PM IST

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (State Housing Minister Jitendra Awhad) यांनी क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त (birth anniversary of Savitribai Phule) आयोजित कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.भाजपाचे आमदार आणि नेते गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी आव्हाडांच्या वक्तव्या बद्दल बोलताना आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार असा टोला लगावला आहे.

Padalkar Vs Awhad
पडळकर Vs आव्हाड

पुणे: ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापितांचे सरकार आता मात्र ओबीसीं विषयी प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवतायेत ते निव्वळ हास्यास्पद व फसवे आहे. कारण सर्वोच्च न्यायलयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करेपर्यंत यांनी दिड वर्ष नुसत्या तारखा घेतल्या. केंद्राच्या नावाने ओरड केली. आता मात्र यांची पायाखालची जमिन सरकलेली आहे. आत्ताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहीती नाही. राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत.अशी टिका भाजपाचे आमदार आणि नेते गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

पडळकर Vs आव्हाड



आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही
जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वतला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला? कदाचित प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत.ओबीसींवर तुम्हाला एवढच प्रेम असेल तर भारतीय जनता पक्ष सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवार देणार आहे,त्यांना आपण निवडूण द्यावे. अन्यथा तुम्हीही फक्त ओबीसीच उमेदवार देणार आहात, असे तरी जाहीर करावे.असं देखील यावेळी पडळकर म्हणाले.

पडळकर Vs आव्हाड



आव्हाड काय म्हणाले होते?

महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त (birth anniversary of Savitribai Phule) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आव्हाड यांच्या भाषणाचा ५१ सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. 'ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,' असं आव्हाड या व्हिडीओत म्हणता दिसत आहेत.

हेही वाचा : MDCC Bank : सहकार विभागाचा दरेकर यांना झटका; मजूर म्हणून केले 'अपात्र'

Last Updated : Jan 4, 2022, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.