ETV Bharat / state

Accidental Black Spot Pune : पुण्यात अपघाताचे प्रमाण वाढले; शहरात 19 जीवघेणे 'ब्लॅक स्पॉट'

author img

By

Published : Jan 18, 2022, 3:39 PM IST

Updated : Jan 18, 2022, 4:23 PM IST

पुणे वाहतूक पोलीसांनी शहरातील असे 19 ब्लॅक स्पॉट जाहीर केले आहेत. जिथे सर्वात जास्त अपघात होतात. या अपघात आत्तापर्यंत २५५ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती शहर वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली आहे.

पुणे अपघात
पुणे अपघात

पुणे - शहरात मागील काही दिवसांत अपघाताचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. शहरातील वाढलेली रहदारी, विकास कामे चालू असल्याने खोदलेले रस्ते, त्यातच अर्धवट रस्त्यांची कामे नेमकी याच कारणामुळे पुणे शहरातील अपघात क्षेत्रामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. अशातच पुणे वाहतूक पोलीसांनी शहरातील असे 19 ब्लॅक स्पॉट जाहीर केले आहेत. जिथे सर्वात जास्त अपघात होतात. या अपघात आत्तापर्यंत २५५ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती शहर वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली आहे.

पुण्यातील अपघाताच्या प्रमाणावरील आढावा
ब्लॅक स्पॉट म्हणजे नेमके काय?

ज्या जागेवर सर्वात जास्त अपघात होतात त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट असे म्हटले जाते. आता याचे निकष ठरवताना गेल्या काही वर्षांत एखाद्या जागेवर 500 मीटर पेक्षा कमी अंतरावर जास्ती अपघात झाले तर त्याला ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर केले जाते पुण्यात असे एकूण 19 ब्लॅक स्पॉट आहेत. पुण्यातील सर्वात जास्त अपघात झालेले शहरातील भाग म्हणजे कात्रज चौक, वारजे मधील माई मंगेशकर हॉस्पिटल, वैदुवडी चौकसह, नवले पुल हे ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर झाले आहेत.

ब्लॅक स्पॉट अपघात

खडी मशीन चौक ७
कात्रज चौक २२
वैदुवाडी चौक १५
फुरसुंगी फाटा चौक ९
फुरसुंगी रेल्वे ब्रीज ११
आय बी एम सासवड रॉड ७
माई मंगेशकर रुग्णालय १७
मुठा नदी पुल ६
डुक्कर खिंड ११
मुंढवा रेलवे ब्रीज १२
नवीन कात्रज बोगदा ९
दरी पुल ११
नवले पुल १६
भुमकर ब्रीज ९
टाटा गार्ड रुम ६
खराडी बायपास चौक १०
थिटे वस्ती ५
साईनाथ चौक ५
पठाणशहा दर्गा ६

मागील वर्षी पुणे शहरात एकूण ७४१ अपघात झाले आणि त्यातील २५५ जणांना आपले जीव गमवावे लागले. यातील प्राणांतिक अपघतांची संख्या २३९ होती. तर शहरात २०२१ साली ३९१ गंभीर अपघात झाले आहे, अशी माहितीही वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - Bulli Bai App Case : बुलीबाई अ‍ॅप प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी

Last Updated : Jan 18, 2022, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.