ETV Bharat / state

Accident on Nagar Kalyan Highway : रस्त्यानं चालत जाणाऱया पाच शेतमजुरांना कारनं चिरडलं; तिघांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 9:47 AM IST

Updated : Sep 25, 2023, 10:58 AM IST

Accident on Nagar Kalyan Highway : कल्याण-नगर महामार्गावरील आळेफाटा येथे भीषण अपघात झालाय. भरधाव कारनं पाच शेतमजुरांना जोरदार धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झालाय. हे सर्व शेतमजूर रस्त्यानं चालत जात होते.

Etv Bharat
Etv Bharat

पुणे (पिंपरी-चिंचवड) : Accident on Nagar Kalyan Highway : कल्याण-नगर महामार्गावरील एका भरधाव येणाऱ्या कारनं पाच परप्रांतीय मजुरांना चिरडलंय. यामध्ये दोन मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोघांवर उपचार सुरू : काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून हे सर्व कामगार कामाला आले होते अशी माहिती समोर आली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. तर दिनेश जाधव आणि विक्रम तारोले अशी जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. गाडीचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

शेतमजुरांना चिरडलं : याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेश राज्यातील पाच शेतकरी कुटुंब तीन दिवसांपूर्वीच कल्याण महामार्गावरील डिगोरे परिसरात कामाच्या शोधानिमित्त वास्तव्यास आले होते. त्यानंतर त्यांनी मिळेल ते काम करायला सुरुवात केली. पाचही शेतमजुरांना एका शेतामध्ये मजुरीचे काम मिळालं होतं. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपलं काम उरकून पाचही शेतमजूर आपल्या घराकडं निघाले होते. पाचही शेतमजूर हे रस्त्याच्या कडेनं पायी चालत जात होते. दरम्यान, नगर - कल्याण महामार्गावर कल्याणकडून ओतूरच्या दिशेनं भरधाव वेगात जाणाऱ्या कारनं (एम एच १२ व्ही क्यू ८९०९) या पाच मजुरांना जोरात चिरडलं.

तिघांचा मृत्यू : अपघात इतका भीषण होता की या घटनेमध्ये दोन मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला. तर अन्य तीन मजूर गंभीररित्या जखमी झाले होते. अपघातानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. तत्काळ घटनेची माहिती आळेफाटा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचून जखमींना आळेफाटा येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, एक जखमी शेतमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओतूर पोलिसांनी लगेच संबंधित गाडी मालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. याबाबत ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनात फरार झालेली कार अपघातानंतर अगदी काही वेळातच मिळवून आली. गाडी चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

हेही वाचा - Nashik Accident News : भीषण अपघात; गणपती घेण्यासाठी आलेल्या कारने अनेकांना उडवले

Last Updated : Sep 25, 2023, 10:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.