ETV Bharat / state

Palaj Ganpati 2022 दोन राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे पाळजचा गणपती, जाणून घ्या मंदिराचा इतिहास

author img

By

Published : Sep 1, 2022, 11:00 PM IST

Palaj Ganpati तेलंगणा सीमेवरील भोकर तालुक्यातील पाळज हे गाव, मातृभाषा तेलगु असूनही येथील चालीरीती व अधिक व्यवहार मात्र तेलंगणाशी असतो. रूढी परंपरा दाक्षिणात्य संस्कृतीशी जुळणाऱ्या असल्या तरी गावकरी मात्र मराठमोळं सण मोठ्या भक्तिभावाने जपतात.

पाळज गणपती 2022
पाळज गणपती 2022

नांदेड तेलंगणा सीमेवरील भोकर तालुक्यातील पाळज हे गाव, मातृभाषा तेलगु असूनही येथील चालीरीती व अधिक व्यवहार मात्र तेलंगणाशी असतो. रूढी परंपरा दाक्षिणात्य संस्कृतीशी जुळणाऱ्या असल्या तरी गावकरी मात्र मराठमोळं सण मोठ्या भक्तिभावाने जपतात. हा सण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव, खरं तर पाळज फेस्टिव्हल म्हणायला हवे. गणेश म्हणजे गावाचं वैभव, आराध्य दैवत तर तेलंगणातील भक्ताचा कंठमणीच आहे. Palaj Ganpati Temple nanded पाजळ गावातील या मंदिरात दरवर्षी 11 दिवसाच्या गणेशोत्सवात 4 ते 5 लाख भाविक दर्शन घेतात. हे 11 दिवस म्हणजे ग्रामस्थांची दिवाळी व दसराच असतो.

पाळज गणपती 2022

किनी पाळजची १९४८ ला राखरांगोळी ग्रामप्रमुखाच्या स्वप्नात श्रीगणेशाने दर्शन दिल्याची आख्यायिका मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या इतिहासाच्या पानावर किनी व पाळज या गावाचे नावे तेवढेच महत्त्वाचे आहे. यावेळी या दोन्ही गावातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. कित्येकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून अस्मानी संकटाचा मुकाबला केला. Palaj Ganapati Festival 2022 वैभवसंपन्न किनी पाळजची १९४८ ला राखरांगोळी झाली. या दरम्यान ग्रामस्थांना श्रीगणेशाची मूर्ती स्थापना करण्याची निकड भासू लागली. निजामाच्या जुलमी राजवटीत हे मोठे आव्हानात्मक काम होते. यावेळी महामारी असताना एका रात्री संटी भोजन्ना या ग्रामप्रमुखाच्या स्वप्नात विघ्नहर्ता श्रीगणेशाने दर्शन देऊन संकट निवारणार्थ प्रेरणा दिली आणि श्रींच्या प्रतिमेची स्थापना करून तिचे विसर्जन न करण्यास सांगितले.

साथीच्या रोगावर नियंत्रण १९४८ ला गावात कॉलरा साथीच्यां रोग पसरले होते. तेव्हा गणपती उत्सात ही मुर्ती स्थापन करण्यात आली होती. अकरा दिवसात साथीच्या रोगावर नियंत्रण आले होते, असे सांगण्यात येते. त्यावेळेस गावकऱ्यांनी असे ठरविले, की या मुर्तीचे विसर्जन न करता दरवर्षी गणपती उत्सवाच्या काळात 11 दिवस या मुर्तीची पुजा करायची या मुर्तीचे विसर्जन करायचे नाही, असे ठरविले. Palaj Ganapati Festival 2022 या मुर्तीचे विसर्जन न करता दरवर्षी गणपती उत्सवाच्या काळात अकरा दिवस या न मुर्तीची पुजा करायची. या मुर्तीचे विसर्जन करायचे नाही, असे गावकऱ्यांच्या वतीने १९४८ ला ठरविण्यात आले होते.

नवसाला पावणारा हा गणपती तेव्हापासून ते आजपर्यंत गणेश उत्सवाच्या काळात या सुंदर अशा लाकडी मुर्तीची 11 दिवस पुजा केली जाते. Palaj Ganapati Festival 2022 त्यासमोर एक दुसरी गणपतीची मुर्ती ठेवण्यात येते. या दुसऱ्या मुर्तीचे विसर्जन करण्यात येते. नवसाला पावणारा हा गणपती म्हणून ओळखले जात आहे.

हेही वाचा Ganesh Chaturthi 2022 दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव महाराष्ट्रात होतोय साजरा, भव्य देखाव्यासह सामाजिक संदेश देण्याकडे मंडळांचा कल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.