ETV Bharat / state

लोकसभा मतकंदनः विदर्भातील ७ लोकसभा मतदार संघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; वाचा कोण आहेत ते...

author img

By

Published : Apr 9, 2019, 7:54 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे.

लोकसभा मतकंदनः विदर्भातील ७ लोकसभा मतदार संघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. यामध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठान पणाला लागली आहे. ज्यामध्ये विद्यमान खासदारांचा देखील समावेश आहे. पहिल्या टप्यातील मतदान ११ एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीचे अनेक प्रस्थापित आणि नव्या उमेदवारांमध्ये लढत आहे. विदर्भात कोण कोणाविरोधात लढत आहे. यांचा घेतलेला हा आढावा...


नागपूर
नागपूर लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात अक्षरशः दिवस-रात्र एक केली आहे. नागपूरचा गड राखने हे गडकरींसाठी आव्हान आहे. तर भाजपातून नुकतेच काँग्रेसवासी झालेले नाना पटोले यांनी सुद्धा मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. त्यामुळे पटोले यांना गडकरींच्या विजयाचा रथ रोखण्याचा विश्वास आहे. गडकरी संघ भूमीचे प्रतिनिधित्व करत असल्याने, त्यांच्या मागे संघ ताकतीने उभा आहे. मात्र, नागपुरात गटा-तटात विभागलेले काँग्रेस नेते नानांच्या मागे एक दिलाने उभे राहिल्याने, नानाचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.

वर्धा
वर्धा लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध काँग्रेस पक्षाचे उमेदवार चारुलता टोकस यांच्यात खरी लढाई दिसून येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत रामदास तडस मोदी लाटेत स्वार झाल्याने त्यांनी २ लाख १५ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, यावेळी चारूलता टोकस यांच्याशी त्यांची लढत होत आहे. टोकस हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे रामदास तडस यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. वर्धा लोकसभेसाठी शहरी भागात भाजप मजबूत असली तरी ग्रामीण भागात काँग्रेसने मुसंडी मारण्याची शक्यता आहे.

यवतमाळ- वाशीम
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेने उमेदवार भावना गवळी या खासदार आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना मैदानात उतरविले आहे. तर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे शेतकरी विधवा वैशाली येडे या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे यवतमाळ-वाशिममध्ये तिरंगी लढत होणार आहे. भावना गवळी यांना विजयाचा विश्वास असला वैशाली येडे यांनी ग्रामीण भागात जोरदार प्रचार यंत्रणा राबवल्याने गवळी यांच्यासमोर मोठ्ठे आव्हान निर्माण झाले आहे. तसेच माणिकराव ठाकरे हेही या लढतीत असल्याने ही लढत चुरशीची होईल. असा तर्क वर्तवण्यात येत आहे.

चंद्रपूर
यंदाची लोकसभा निवडणूक देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासाठी सोपी नाही आहे. कारण शिवसेना पक्षाचे आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचा 'पंजा' हातात घेतला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र बदललेले आहे. बाळू धानोरकर यांनी यंदा जोरदार प्रचार सुरू केला आहे. यामुळे हंसराज अहिर यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

रामटेक
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक यांच्यावर मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला होता. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असून कृपाल तुमाने यांनाही या मतदारसंघातून विजय मिळवणे सोपे राहिलेले नाही. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघातील लढत ही चुरसीची होणार आहे.

Intro:लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्यात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठान पणाला लागली आहे ज्यामध्ये विद्यमान खासदारांचा देखील समावेश आहे....नागपुरातून नितीन गडकरी, चंद्रपूर येथून हंसराज अहिर,वर्धा येथील खासदार रामदास तडस यवतमाळ-वाशिम च्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे शिवसेना उमेदवार कृपाल तुमाणे यांच्या सह काँग्रेसच्या अनेक नेत्यांची देखील समावेश आहे


Body:लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे.....या निवडणुकीचे अनेक प्रस्थापित आणि नव्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे....

*नागपूर*
साऱ्या देशाचे लक्ष असलेल्या नागपूर येथील निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले यांच्यात थेट लढत होत असून दोन्ही उमेदवारांनी प्रचारात अक्षरशः दिवस-रात्र एक केली आहे...नागपूरचा गड राखने हा गडकरींच्या नाकाचा प्रश्न झाला आहे..करण गडकरी संघ भूमीचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्या मागे संघ ताकतीने उभा आहे तर भाजपातून कॉंग्रेसवासी झालेले नाना पटोले यांनि सुद्धा जोरदार मोर्चेबांधणी केल्याने गडकरींच्या विजयाचा रथ रोखण्याचा त्यांना विश्वास आहे...नागपुरात गटा-तटात विभागलेले काँग्रेस नेते नानांच्या मागे एक दिलाने उभे राहिल्याने नानाचा आत्मविश्वास वाढला आहे

वर्धा

वर्धा लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध काँग्रेस पक्षाचे उमेदवार चारुलता टोकास यांच्यातच खरी लढाई दिसून येत आहे...2014 च्या निवडणुकीत रामदास तडस मोदी लाटेत स्वार झाल्याने त्यांनी 2 लाख 15 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता...चारूलता टोकास या देखील अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात सक्रिय असल्याने त्यांनी रामदास तडस यांच्या समोर तगडे आवाहन सादर केले आहे...शहरी भगत भाजप जरी मजबूत वाटत असली तरी ग्रामीण भागात काँग्रेसने मेहनत घेतली आहे


यवतमाळ- वाशीम

यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेने उमेदवार भावना गवळी या खासदार आहेत.... यावेळी त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना मैदानात उतरविले आहे तर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे शेतकरी विधवा वैशाली येडे या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने यवतमाळ-वाशिम मध्ये त्रिकोणीय लढत बघायला मिळते भावना गवळी यांना विजयाचा विश्वास असला तरी माणिकराव ठाकरे आणि वैशाली येडे त्यांच्यापुढे कडवे आव्हान देताना दिसतात वैशाली येणे यांनी ग्रामीण भागात जोरदार प्रचार यंत्रणा राबवल्याने प्रस्थापित आणि पुढे मोठे आव्हान त्यांनी निर्माण केले आहे त्यामुळे सर्वात चुरशीची लढत ही यवतमाळ-वाशीम मध्ये बघायला मिळेल



चंद्रपूर

देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या करिता देखील विजयाचा मार्ग सोपा राहिलेला नाही कारण शिवसेना पक्षाचे आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचा पंजा हातात घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र बदललेले आहे एवढेच काय तर निवडणुकीचे कमी करून देखील बदलल्याचं बघायला मिळतात बाळू धानोरकर यांनी जोरदार प्रचार करत हंसराज अहिर यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण केल्याने इथून कोणाची सरशी होईल हे 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे..


रामटेक
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात निवडणूक होते आहे यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे येथून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक यांच्यावर मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला होता मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असून कृपाल तुमाने यांनाही येथून विजय मिळवणे सोपे राहिलेले नाही काँग्रेस पक्षाच्या उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवून कृपाल तुमाने यांच्या विरुद्ध प्रचारात रान उठवले आहे त्यामुळे कृपाल तुमाने यांना ही निवडणूक जड जाईल किस सोपी याचा निकाल 23 मे रोजी लागेल



महत्वाची सूचना व विश्लेषणात्मक बातमी त्या त्या जिल्ह्याच्या उमेदवारांचे फोटो किंवा व्हिडिओ लावण्याची कृपा करावी


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.