ETV Bharat / state

President Draupadi Murmu : संघर्ष करून पुढे जा; समाजबांधवांचा विकास करा - राष्ट्रपतींचा आदिवासी समुहाच्या प्रतिनिधींशी संवाद

author img

By

Published : Jul 6, 2023, 5:36 PM IST

जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. (President Draupadi Murmu) आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे (Visit of President Draupadi Murmu Nagpur) व स्वतःचा आर्थिक, सामाजिक (Struggle of Tribals) आणि शैक्षणिक विकास साधतानाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे,असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. त्यांनी आज नागपूर येथे विविध आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

President Draupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नागपूर : येथील राजभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी आदिवासी समुहातील माडिया, कातकरी आणि कोलाम (Visit of President Draupadi Murmu Nagpur) जमातींच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यावेळी उपस्थित होते. (Struggle of Tribals)


राष्ट्रपतींनी आपला जीवनप्रवास उलगडला: शाळेत जायला धड रस्ते नव्हते. वह्या, पुस्तके नेण्यासाठी दप्तर नसायचे. डोक्यावर कापडी पोतं पांघरून भर पावसाळ्यात शाळेत जावे लागायचे. पदोपदी संघर्ष होता. दर मजल करत यश संपादन करून शिक्षिका, राज्यपाल आणि देशाची राष्ट्रपती झाले, अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपला जीवनप्रवास उलगडला. तो ऐकताना सारेच उपस्थित भारावले होते. आदिवासींनी न्यूनगंड न बाळगता शालेय व उच्च शिक्षण घेतले पाहिजे. उच्चपदे भूषवून आपल्या समाज बांधवांनाही विकासाच्या प्रवाहात पुढे नेले पाहिजे, असे उद्बोधक मार्गदर्शन राष्ट्रपतींनी केले.


७५ जमाती या अतिमागास : राष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देशातील जवळपास सर्वच राज्यांना भेटी दिल्या. देशात एकूण ७०० आदिवासी जमाती असून यातील ७५ जमाती या अतिमागास असल्याचे चित्रही निदर्शनास आले. ७०० जमातींच्या १ हजारांहून अधिक बोलीभाषा आहेत. या भाषांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनांनी आदिवासींच्या कल्याणासाठी विविध योजना व उपक्रम राबविले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतींचा आदिवासींनी पुढाकार घेत आपल्या समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.


आदिवासी कल्याणाच्या योजनेवर समाधान : शासनानाने आदिवासींची सामाजिक स्थिती समजून घेत त्यानुसार वेळोवेळी योजना व उपक्रमांमध्ये संयुक्तिक बदल करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. महाराष्ट्र शासन आदिवासी कल्याणाच्या योजना उत्तम प्रकारे राबवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.



आदिवासी शिक्षणापासून वंचित : यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम जमातीचे प्रतिनिधी डॉ. गंगाधर आत्राम यांनी आदिवासींच्या रोजगाराचा मुद्दा मांडला. रोजगाराअभावी बालवयातच आदिवासींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासींना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळाल्यास त्यांची मुले शिक्षण घेऊ शकतील व प्रगती करू शकतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे गरजेचे : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील कातकरी जमातीच्या प्रतिनिधी डॉ. कौशिका भोये यांनी आदिवासींसाठी मोफत, दर्जेदार आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, अशा भावना व्यक्त केल्या. नीट (NEET) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १० आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून राष्ट्रपतींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


रेला पारंपरिक आदिवासी नृत्याचे सादरीकरण : रेला पारंपरिक आदिवासी नृत्याचे राष्ट्रपतींसमोर उत्तम सादरीकरण झाले. पारंपरिक वेशातील आदिवासी बांधव आणि त्यांनी वाद्यांवर धरलेला ठेका बघून राष्ट्रपतींसह उपस्थितांनी दाद दिली. यावेळी माडिया, कोलाम जमातींद्वारा निर्मित वैशिष्ट्यपूर्ण हस्तशिल्पांच्या दालनास राष्ट्रपतींनी भेट दिली. याठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेल्या हस्तशिल्पांची माहिती त्यांनी जाणून घेतली व कारागिरांची आस्थेने चौकशी केली.

हेही वाचा:

  1. Draupadi Murmu : संस्कृती आणि राष्ट्रभक्तीच्या सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण
  2. Ramayana Cultural Center video: रामायण कल्चरल सेंटरचा व्हिडीओ रिलीज; उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार लोकार्पण
  3. Power outage during Presidents address: राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना अनेकदा गेली लाईट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.