ETV Bharat / state

Devendra Fadnavis : भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात महाराष्ट्र मोठे योगदान देईल - देवेंद्र फडणवीस

author img

By

Published : Aug 15, 2023, 4:38 PM IST

Updated : Aug 15, 2023, 5:01 PM IST

स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपुरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला. 'देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची बनविण्यात महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे योगदान असेल', असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

नागपूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपुरात राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे एका सभेला संबोधित केले. 'सरकार समाजातील सर्व घटकांसाठी चोवीस तास काम करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याच्या स्वप्नात राज्य एक हजार अब्ज डॉलर्सचे योगदान देईल', असे फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले. तसेच राज्याचे सरकार समाजातील सर्व घटकांसाठी आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ड्यूश बँकेच्या अहवालाचा हवाला दिला : 'जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकार काम करेल. भारताला पाच हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या स्वप्नात महाराष्ट्राचा एक हजार अब्ज डॉलरचा हिस्सा असेल', असे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी यावेळी ड्यूश बँकेच्या अहवालाचा हवाला दिला. या अहवालात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था असल्याचे म्हटले आहे.

शौर्य पदके मिळाल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले : समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम होईल, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या सोबतच त्यांनी ३३ शौर्य पदके मिळाल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे विशेषत: गडचिरोली पोलिस दलाचे कौतुक केले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी 'हर घर तिरंगा' आणि 'मेरी माटी, मेरा देश' मोहिमेसाठी समाजातील सर्व घटकांना आणि केंद्र सरकारला एकत्र आणल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र समाजातील शेवटच्या माणसाचे स्वप्ने पूर्ण करेल आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल, असा मला विश्वास असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केले : आज स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मंत्रालयात ध्वजारोहण केले. यावेळी बोलताना त्यांनी, आपण राज्य व केंद्र यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय लिहित असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय उपस्थित होते.

हे ही वाचा :

  1. Devendra Fadnavis : टीव्हीवर बोलणाऱ्यांचे मानसिक आरोग्य तपासून उपचार करा; फडणवीसांचा राऊतांना नाव न घेता टोला
  2. Independance Day 2023 : ध्वजारोहण सोहळ्यात राजकारण; घटनाबाह्य पालकमंत्री म्हणत माजी खासदारांनी भेट टाळली
  3. Independence Day 2023 : गेल्या 10 वर्षांत स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचे 10 वेगवेगळे लूक, पाहा फोटो
Last Updated : Aug 15, 2023, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.