ETV Bharat / state

Woman Suicide Case: मानसिक तणावातून भांडुपमध्ये महिलेची आत्महत्या

author img

By

Published : Aug 20, 2023, 9:55 PM IST

मानसिक तणावातून मुंबईतील भांडुप परिसरात एका 47 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. मृत महिलेचे नाव रीना सोळंकी (वय ४७) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Woman Suicide Case
आत्महत्या

मुंबई: 47 वर्षीय महिलेने आज (रविवारी) सकाळी मुंबईतील पूर्व उपनगरात असलेल्या भांडुप येथील एका उंच इमारतीवरून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी माहिती मिळताच भांडुप पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. नंतर याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत महिलेचे नाव रीना सोळंकी (वय ४७) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

रीना सोळंकी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ: रीना सोळंकी या गेल्या तीन महिन्यांपासून काही आजारांनी त्रस्त होत्या आणि त्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्या होत्या, असे भांडुप पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना 22 मजली त्रिवेणी संगम गृहनिर्माण सोसायटीत सकाळी घडली. रीना सोळंकी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे भांडुप पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक माहितीच्या आधारे भांडुप पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.


रेल्वे लोको पायलटची आत्महत्या: दुसरीकडे कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेमध्ये लोको पायलट असलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या करून आयुष्य संपवलं आहे. सुजित कुमार असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सुजित कुमारने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

युवकाची आत्महत्या: मानसिक तणावातून यापूर्वीही आत्महत्या करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली होती. ज्यामध्ये एका युवकाने आत्महत्या केली होती. दिलीप बळीराम हरणे (२६, रा. सावरखेडा ह. मु. सुराणा नगर, हिंगोली) असे मृत तरुणाचे नाव होते. दिलीप हा मागील दोन-तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यात त्याला दोन वेळा अपयश आले. त्यामुळे तो नेहमीच मानसिक तणावाखाली राहात होता. अशा परिस्थितीत त्याने नांदेड जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्गही लावले होते. मात्र, तो नेहमीच तणावग्रस्त अवस्थेत राहात होता. एवढेच नव्हे तर तो मागील काही दिवसापासून कोणाशीही काही न बोलत एकांतात राहणेच पसंत करत होता.

हेही वाचा:

  1. Nanavare Couple Suicide Case : ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; भावाने 'बोट' छाटून गृहमंत्र्यांना इशारा देताच चार आरोपींना अटक
  2. Osmanabad Crime News : वारकरी शिक्षण संस्थेत मुलाला केले आत्महत्येस प्रवृत्त; पालकांनी केली तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार
  3. Nitin Desai Suicide Case : नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; एडेलवाईजच्या व्यवस्थापकीय संचालकाची आठ तास चौकशी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.