ETV Bharat / state

Sanjay Raut vs Ashish Shelar मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रेशीमबाग भेटीवरून संजय राऊत व आशिष शेलार ट्विटरवर भिडले

author img

By

Published : Dec 29, 2022, 2:58 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस ( Cm Eknath Shinde Visit To RSS Office )यांच्यासोबत रेशीमबागेतील संघ मुख्यालयात भेट दिली. त्यांच्या या भेटीवरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut And Ashish Shelar war ) यांनी ट्विटरवरून टीका केली. त्यांच्या टीकेनंतर भाजपनेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरुन संजय राऊत ( Twitter War Between Sanjay Raut And Ashish Shelar ) आणि आशिष शेलार या दोघामंध्ये ट्विटर वॉर सुरू झाले.

Cm Eknath Shinde Visit To RSS Office
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde Visit To RSS Office ) यांनी गुरूवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग येथील मुख्यालयाला भेट दिली. यावरून खासदार संजय राऊत ( Sanjay Raut And Ashish Shelar war ) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून संघ स्वयंसेवकांकडून निष्ठा शिका, असा सल्ला दिला. त्यावर राऊत यांनी सकाळी हिरवी उलटी केल्याचा प्रतिहल्ला अॅड आशिष शेलार ( Twitter War Between Sanjay Raut And Ashish Shelar ) यांनीही ट्विटच्या माध्यमातून चढवला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये ट्विटवॉर सुरू झाले आहे.

  • हिंदूना सडके म्हणणारा सर्जिल उन्मानी तुम्हाला प्रिय...
    दाऊद बरोबर व्यवहार करणारे तुमचे लाडके...
    म्हणूनच
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाव ठेवणारे, रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके!!
    2/2

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संघ कार्यालय भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Cm Eknath Shinde Visit To RSS Office ) यांनी सकाळी रेशीमबाग येथील संघ कार्यालयाला भेट दिली. या भेटीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर ट्वीटरच्या माध्यमातून टीका ( Twitter War Between Sanjay Raut And Ashish Shelar ) केली आहे. राऊत म्हणाले की, रेशिमबागेत जाऊन आलात आनंद आहे ! या वास्तूसोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती ( Sanjay Raut And Ashish Shelar war ) निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते, असा हल्लाबोल संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

  • रेशिमबागेत जाऊन आलात आनंद आहे! या वास्तू सोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते.
    जय महाराष्ट्र! pic.twitter.com/Zrp1CEeveK

    — Sanjay Raut (@rautsanjay61) December 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राऊत यांच्यावर शेलारांचा पलटवार संजय राऊत यांच्या या ट्वीटचा समाचार घेताना भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. शेलार यांनी ट्वीट करत "मुख्यमंत्री रेशीम बागेत गेले त्याचा त्रास श्रीमान संजय राऊत ( Sanjay Raut And Ashish Shelar war ) यांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली.. काँग्रेस, नवाब मलिक, अस्सलम शेख यांची संगत आणि याकूबच्या थडग्यावर ( Twitter War Between Sanjay Raut And Ashish Shelar ) रोषणाई करणाऱ्यांना असा त्रास, मळमळ, जळजळ होणारच! हिंदूना सडके म्हणणारा सर्जिल उन्मानी तुम्हाला प्रिय...दाऊद बरोबर व्यवहार करणारे तुमचे लाडके...म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाव ठेवणारे, रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके!! अशा शब्दांत शेलार यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे या दोघांचे ट्विटर युद्ध चांगलेच रंगले आहे. त्यांच्या या ट्विटर युद्धावर नेटकरीही सुसाट सुटले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.