ETV Bharat / state

Sanjay Shirsat : शिंदे-पवार यांच्यात शीतयुद्ध नाही तर 'या' कारणाने...; संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Aug 11, 2023, 9:09 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी घटक पक्षासाठी आयोजित केलेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम अचानक रद्द केल्याने त्या चर्चेत भर पडली. विरोधकांनी यावरून टीकेचे बाण सोडले. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज सर्व घटनेचे खंडन केले. आमच्यात कोणतेही शीतयुद्ध नाही. शिवाय, आमची काँग्रेसधार्जिणी संस्कृती नाही. समृद्धी, इर्शाळवाडी सारख्या काही दुःखद घटनांमुळे स्नेहभोजन रद्द केल्याचे ते म्हणाले. समृद्धी महामार्गावर खासगी बस दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांना दिलेल्या शपथविधीचा शिरसाट यांना मात्र विसर पडला.

Sanjay Shirsat Clarification
संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण

संजय शिरसाट यांची शिंदे, पवार शीतयुद्धावर प्रतिक्रिया

मुंबई : संजय शिरसाट म्हणाले, विरोधी पक्षांना आता काही काम उरलेले नाहीत. त्यांची भूमिका वेगळी असते; मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये काय सुरू आहे, हे वाकून बघण्याचे काम करत आहेत; परंतु आमच्यात कोणतेही शीतयुद्ध नाही. कोणी कमजोर नाहीत. उलट प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. जबाबदारी वाटून सगळ्यांना मिळून-मिसळून काम करण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची पध्दत आहे. माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे कधीही घेत नाहीत, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

राजकारणात पूर्ण विराम नाही तर स्वल्पविराम: मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून लवकरच होईल, अशी चर्चा आहे. राजकारणात कोणताही फूल स्टॉप नसतो, स्वल्पविराम असतो. घडामोडी सतत होत असतात. विस्ताराबाबत पक्ष नेतृत्व भूमिका घेतात. त्यामुळे सातत्याने विस्ताराच्या वावड्या उठवणे योग्य नाही, असे शिरसाट म्हणाले. विश्वासाची प्रत्येकाला आशा असते. आम्हालासुद्धा इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसधार्जिणी संस्कृती नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेतील घटक पक्षांसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते; मात्र अचानक स्नेहभोजन रद्द केले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे. शिरसाट यांनी यावर उत्तर दिले. स्नेहभोजन रद्द केले; परंतु त्यामागे अनेक कारणे होती. समृद्धी महामार्गावर गर्डर टाकताना अपघात झाला. दुसरीकडे रायगडमधील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली. अशा दुःखद घटनांनंतर जेवणावेळी घालण्याची आमची काँग्रेस धार्जिणी संस्कृती नाही. एकीकडे दुःख दाखवायचे दुसरीकडे मटणावर ताव मारायचा, अशी शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला कधीही दिली नसल्याचे शिरसाट म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय घेतील: 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात येतोय. संजय शिरसाट यावर खुलासा करताना म्हणाले की, हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येत आहे. आम्ही आमची बाजू अध्यक्षांकडे मांडली आहे. ते योग्य प्रकारे यावर निर्णय घेतील. याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहेत. विधानसभा अध्यक्ष हा चेंडू योग्य प्रकारे हाताळतील, असे त्यांनी सांगितले. त्यांनी लोकसभा निवडणुकीवरून विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांना दावे-प्रतिदावे करू द्या; परंतु जनता सगळं पाहत आहे. त्यांच्या मनात काय आहे, हे निवडणुकीनंतरच कळणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांची जागा त्यांना दिसून येईल, असे ही शिरसाट म्हणाले.

हेही वाचा:

  1. Guardian Minister Appointment Issue : आता तात्पुरत्या पालकमंत्री पदाचाही वाद; हंगामी पालकमंत्री ठरवून ध्वजारोहण उरकण्याचे धोरण
  2. Rahul Gandhi : 'मोदींना मणिपूर जाळायचे आहे, सैन्याने मनात आणले तर..', राहुल गांधींचा गंभीर आरोप
  3. Sunil Tatkare On CM : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांच्यात कोल्ड वॉर? सुनील तटकरेंनी दिले 'हे' स्पष्टीकरण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.