ETV Bharat / state

State Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक, शिंदे सरकारचा नामांतराचा पुन्हा निर्णय

author img

By

Published : Jul 16, 2022, 10:54 AM IST

Updated : Jul 16, 2022, 12:07 PM IST

एकनाथ शिंदे सरकारने आज राज्यमंत्री मंडळाची बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला एकनाथ शिंदे सरकारकडून ब्रेक लावण्यात आला होता. मात्र हा निर्णय एकनाथ शिंदे सरकार पुन्हा एकदा नव्याने घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर (State Cabinet Meeting) नव्याने नामांतराच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

Shinde Govt
शिंदे सरकार

मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद (Aurangabad renamed) शहराचे संभाजीनगर, उस्मानाबाद शहराचे धाराशिव असा नामांतराचा निर्णय घेतला होता. तर नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील (Di Ba Patil International Airport) यांचे नाव देण्याचा निर्णय ही ठाकरे सरकारने घेतला होता.

मात्र एकनाथ शिंदे सरकारने स्थगिती दिली होती. राज्यपालांनी बहुमत चाचणी देण्याचे आदेश राज्य सरकारला दिल्यानंतर कोणतेही धोरणात्मक निर्णय सरकार घेऊ शकत नाही. त्यामुळे तत्कालीन सरकारने घेतलेले नामांतराचे निर्णय हे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचा आक्षेप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला होता. मात्र तत्कालीन सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागतही केलं होतं. तसेच तांत्रिक मुद्दे पूर्ण करून हे निर्णय पुन्हा घेतले जातील असे संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले होते.


महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती - राज्यामध्ये एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Govt Decision) घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिली. त्यामुळे आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील ठाकरे सरकारच्या आणखी काही निर्णयांना स्थगिती दिली जाईल का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

नवीन सरकार नामांतराचा निर्णय घेणार - सत्तेत आल्यानंतर पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास आघाडी सरकारने नामांतरांच्या घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. मात्र आक्षेप घेत असतानाच हे निर्णय योग्य असल्याचे म्हटलं होतं. मात्र राज्यपालांनी विश्वास दर्शक ठराव बाबत पत्र दिल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय पुन्हा घेऊन त्यांना तांत्रिकदृष्ट्या योग्य करावी लागतील असे सुतवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच महाविकास आघाडी सरकारने घेतलेले या निर्णयाचे स्वागतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं होतं. त्यामुळे सध्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिली असली तरी, लवकरच नामांतराचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

इतिहास तज्ज्ञांचा आक्षेप- शहराचे नाव संभाजीनगर करा या मागणीवरून सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. याच मुद्द्यावरून गेल्या 34 वर्षांपासून अनेकवेळा संघर्ष निर्माण झाले. मात्र, संभाजीमहाराजांचे नाव देण्याचीच मागणी का केली गेली. याचं उत्तर बहुतांश लोकांना माहित नाही. शिवसेना ( Shivsena ) म्हणते हा याच शहरात संभाजी महाराजांचे हाल करून मारले, त्यामुळे शहराला त्यांचे नाव द्यायचे आहे. तर दुसरीकडे महाराज फक्त दोनदा शहरातून गेले त्यांना मारल्याचे पुरावे नाहीत, असं इतिहास तज्ञाचं म्हणणं आहे. त्यामुळे हा अट्टाहास का असा प्रश्न निर्माण होत आहे.



हेही वाचा : maharashtra political crisis : माजी मंत्री विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी

Last Updated : Jul 16, 2022, 12:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.