ETV Bharat / state

अभिनेता साहिल खानसह चौघांना एसआयटीनं पाठविले समन्स, महादेव ॲप प्रकरणात आज  करणार चौकशी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 10:41 PM IST

Updated : Dec 15, 2023, 7:14 AM IST

Mahadev App Case : महादेव अ‍ॅप प्रकरणात गुन्हे शाखेकडे माटुंगा पोलीस ठाण्यातून (Matunga Police Station) गुन्हा वर्ग करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर शाखेच्या ३ अधिकाऱ्यांची एसआयटी नेमण्यात आली आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खानला (Actor Sahil Khan) आज सकाळी 10:30 चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.

Mahadev App Case
महादेव ॲप प्रकरण

मुंबई Mahadev App Case : महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अभिनेता साहिल खान, (Actor Sahil Khan) त्याचा भाऊ सॅम खान, हितेश खुसलानी आणि अमित शर्मा यांना समन्स पाठवला आहे. त्यांना शुक्रवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. बुधवारी सत्र न्यायालयाने खान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळं गुन्हे शाखेच्या सायबर विभागानं महादेव ॲप प्रकरणात तपासाचा वेग वाढवला आहे.

साहिल खानला बजावण्यात आला समन्स : मुंबई पोलिस दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, अभिनेता साहिल खान आणि इतर तिघांना शुक्रवारी एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे. महादेव बेटिंग ॲपची चौकशी करणाऱ्या एसआयटीला आरोपांबाबत साहिल खानची बाजू जाणून घ्यायची आहे. याप्रकरणी एकूण 32 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यात साहिल खान हा २६ वा आरोपी असून त्याचा भाऊ सॅम खान याचा २७ क्रमांकाचा आरोपी आहे. तर अमित शर्माचे नाव एफआयआरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून हितेश खुसलानी याचे नाव २५ व्या क्रमांकावर आहे. अभिनेता साहिल खानने 'स्टाइल' आणि 'एक्सक्यूज मी' सारखे हिट चित्रपट केले आहेत. आता तो चित्रपट सृष्टीपासून दूर राहून फिटनेसतज्ज्ञ बनला आहे.



माटुंगा पोलिसात एफआयआर दाखल : एसआयटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, खान आणि इतर ३६ लोकांविरोधात चौकशी सुरू आहे. या तपासणीत त्यांची बँक खाती, मोबाईल, लॅपटॉप आणि सर्व तांत्रिक उपकरणांची तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी 67 वेगवेगळ्या बेटिंग साइट तयार केल्या आहेत. त्याद्वारे लोकांना बेकायदेशीरपणे सट्टा लावला जातो. आरोपींनी पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी 2000 हून अधिक सिमकार्डचा वापर केला होता. ही सिमकार्ड खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता. 15 हजार कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबईतील माटुंगा पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला होता, जो पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.



आरोपींची संख्या ३७ : 'एफआयआर'मध्ये एकूण 32 जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग केल्यानंतर आरोपींची संख्या ३२ वरून ३७ वर गेली आहे. आरोपींमध्ये पंजाबचे रोहितकुमार मुरगई, दुबईचे कुमार राठी, छत्तीसगडचे शुभम सोनी, छत्तीसगडचे अतुल अग्रवाल, पश्चिम बंगालचे विकास चपरिया, मुंबई माटुंगाचा अमित शर्मा, दुबईचे लाला राठी, छत्तीसगडचे अभिषेक राठी, मुंबईतून खानजम ठक्कर, दिल्लीचा अमित जिंदल जैन, छत्तीसगडचा चंद्र भूषण वर्मा, गुजरातचा अमित मजिठिया, लंडनमधील दिनेश राठी, मुंबईतील छंदर, दुबईतील बेदी राठी, पंजाबचा राजीव राठी, दुबईतील कृष्णा राठी आणि बऱ्याच आरोपींचा समावेश आहे. दरम्यान, मुख्य आरोपी असलेले सौरभ चंद्राकार आणि रवी उप्पल हे दोघेही छत्तीसगडमधील आहेत. मुंबईचा अमित बॉम्बे, लंडनमधील दिनेश खंबाट, दुबईतील चंदर अग्रवाल, मुंबईतील मोहित बर्मन, दुबईतील हेमंत सुद, मुंबईतील गौरव बर्मन, अहमदाबादमधील हरेशभाई कलाभाई चौधरी, दुबईतील भरत चौधरी, दुबईचा अमर राठी, मुंबईचा रणवीर रॉय, मुंबईचा हितेश खुसालनी, मुंबईचा साहील खान आणि सॅम खान, अमृतसरचा राजीव भाठीया, मुंबईतील वसीम कुरेशी, दुबईचा किश लक्ष्मीकांत आणि माटुंगाचा एक अनोळखी इसमाचा यात समावेश आहे.

हेही वाचा -

  1. Mahadev App Case: महादेव ॲप प्रकरण: खिलाडी ॲप संदर्भात 15 हजार कोटींच्या फसवणुकीचा तपास EOW कडे वर्ग करणार
  2. ललित पाटील प्रकरणात कोणालीही सोडणार नाही - देवेंद्र फडणवीस
  3. एमडी प्रकरण; 106 कोटींचे अमली पदार्थ जप्त, तीन आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी
Last Updated : Dec 15, 2023, 7:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.