ETV Bharat / state

Sanjay Raut on Maratha Reservation: मराठा आरक्षणाकरिता तिसरी आत्महत्या झाल्यास...संजय राऊत यांचा सरकारला इशारा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 1:12 PM IST

Updated : Oct 23, 2023, 2:00 PM IST

मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असताना तीन आत्महत्या झाल्या आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकारवर टीका केली.

Sanjay Raut on Maratha Reservation
Sanjay Raut on Maratha Reservation

मुंबई- आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी तीन आत्महत्या झाल्यानं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला. चौथी आत्महत्या झाल्यास मराठा समाजानं सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलत होते.

खासदार संजय राऊत म्हणाले की, सरकारला आरक्षण द्यायचे आहे की नाही? हे स्वतःला मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. आज तिसरी आत्महत्या झाली. परवा 24 तारखेला जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आहे. तीन आत्महत्या झाल्या तरी सरकारच्या डोळ्यांची पापणीदेखील हलत नाही. मराठा मतांसाठी भारतीय जनता पक्षानं मराठ्यांचा चेहरा म्हणून तुम्हाला बसवलं आहे ना? सरकार फक्त जाहिराती करत आहेत. आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ, यासाठी तुम्हाला बसवलं नाही.

आम्हाला काही सर्टिफिकेट नको-संजय राऊत- पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, तुमच्या सरकारमधील काही लोक हे वेगळ्या दिशेने चालले आहेत. त्यामुळे या राज्यामध्ये दिवाळीच्या आधी वातावरण बिघडू शकत नाही. तुमच्या सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हुलकावण्या देत आहेत. लोकांना भडकावत आहेत. शिंदे गटातील काही स्वतःला मराठा समजणारे काही 96 कुळी नेते आहेत. ते लोकांना भडकवत आहेत. आम्ही कुणबी नाही. आम्हाला काही सर्टिफिकेट नको, अशी विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सरकारमधील नेते मंत्री करत आहेत.

दिल्लीत केंद्रातील नेत्यांची भाषा वेगळी आहे. या आंदोलनामध्ये जी फूट पाडण्याची सधन मराठ्यांनी रणनीती आखली आहे का? हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. दुर्बल मराठा समाजासाठीचा लढा मनोज जरांगे पाटील यांचा आहे. जर चौथी आत्महत्या झाली तर मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवादाचा एफआयआर दाखल करावा-खासदार संजय राऊत

५ दिवसांमध्ये तीन आत्महत्या- मुंबईतील वांद्रे भागात एका 45 वर्षीय मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानं आत्महत्या केली. त्यानंतर मागच्या 5 दिवसांत आतापर्यंत 3 जणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये समाजातील लोकांना आरक्षणाच्या प्रश्नासाठी लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा बांधव आक्रमक होत आहे. सरकारचीदेखील चिंता वाढली आहे.

हेही वाचा-

  1. Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; सरकारला शेवटचा इशारा
  2. Maratha Reservation Protest : एकच मिशन, मराठा आरक्षण.. आरक्षण जालन्यातील 245 गावांत राजकीय पुढाऱ्यांना 'गावबंदी'
Last Updated : Oct 23, 2023, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.