ETV Bharat / state

हजारो शेतकऱ्यांना घेऊन रविकांत तुपकर आज मुंबईत करणार आंदोलन

author img

By

Published : Nov 23, 2022, 9:09 AM IST

कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, पीककर्जासाठी सीबीलची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे. शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम कर्जात वळती करु नये, आदी मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहे. २३ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो ( farmers agitation in Mumbai ) शेतकरी, कार्यकर्ते मुंबईकडे कूच करतील.

Ravikant Tupkar
रविकांत तुपकर

मुंबई : सोयाबीन कापसाच्या प्रश्नाबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आज मुंबईत आंदोलन करणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार सोयाबीन- कापसाच्या प्रश्नावर अद्यापही गंभीर नाही. झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आता आरपारची लढाई लढायची, असे म्हणत हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, असा इशारा रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच दिला आहे.

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या : कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, पीककर्जासाठी सीबीलची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे. शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम कर्जात वळती करु नये, आदी मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहे. २३ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी, कार्यकर्ते मुंबईकडे कूच करतील. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी मंत्रालया शेजारी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीवरुन अरबी समुद्रात जलसमाधी घेतील, असा गंभीर आणि निर्वाणीचा इशारा रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच दिलेला आहे.

शेतकरी आर्थिक संकटात: खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा प्रंचड नुकसान झाले आहे. सोयाबीन तसेच कापसाच्या पीकाचे मोठे नुकसान झाल्याने, त्या उत्पादनातून शेतकऱ्याचा खर्चही निघाला नाही, शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल साडेआठ हजार रुपये तर कापसाला साडेबारा हजार प्रति क्विंटल भाव द्यावा. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी व शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ( Swabhimani Sangathan Ravikant Tupkar ) यांच्या नेतृत्वात आज ( grand Elgar march in buldhana) आंदोलन करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.