ETV Bharat / state

Rahul Narwekar Vs Thackeray Group : राहुल नार्वेकरांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप; म्हणाले, 'माझ्या निर्णय प्रक्रियेवर...'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 5:13 PM IST

Updated : Oct 4, 2023, 6:11 PM IST

Rahul Narwekar Vs Thackeray Group : अनेकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटावर केलाय. तसेच ज्यांना संविधान आणि नियमाचे ज्ञान नाही, त्यांना माहिती नाही की या सर्व प्रक्रियेत कोणते नियम लागू होतात. अशा लोकांच्या टीकेला उत्तर देऊन आपला वेळ वाया घालवणे योग्य नाही, असा टोलाही राहुल नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय.

Rahul Narvekar
राहुल नार्वेकर

मुंबई : Rahul Narwekar Vs Thackeray Group : मतदारसंघातील व्हायरल व्हिडिओसंदर्भात स्पष्टीकरण देत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय. ज्यांना संविधान आणि नियमाचे ज्ञान नाही, त्यांना माहिती नाही की या सर्व प्रक्रियेत कोणते नियम लागू होतात. अशा लोकांच्या टीकेला उत्तर देऊन. आपला वेळ वाया घालविणे योग्य नाही, असा टोलाही राहुल नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय. तसेच अनेकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोपही राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटावर केलाय.

मी नियमानुसार काम करणार : 'परदेश दौरा रद्द झाल्यामुळे विधानसभा अध्यक्ष संतापलेले दिसताय', अशी बोचरी टीका ठाकरे गटाकडून नार्वेकरांवर करण्यात आलीये. या टीकेला उत्तर देत राहुल नार्वेकर म्हणाले की, “अनेक माध्यमातून आणि लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु, मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मला जो आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्यायचाय, आमदार अपात्रतेसंदर्भात संविधानात ज्या तरतुदी दिल्यात, त्या आधारावरच मी निर्णय घेणार. कोणी कितीही मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, कोणत्याही प्रकारचे आरोप केले, तरीही मी यात कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाहीये. मी नियमानुसार काम करणार ,” असे नार्वेकर म्हणाले.

तुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही : परदेश दौऱ्यासंदर्भात बोलत असताना राहुल नार्वेकर म्हणाले की, “तुम्ही पाहिलं तर मी माझा परदेश दौरा 26 सप्टेंबरला रद्द केलाय. मी यासंदर्भात सीपीएला कळविले होते. माझी काही पूर्वनियोजीत कार्यक्रम आहेत. काही महत्त्वाची कार्यक्रम असल्यामुळे मी त्या कॉन्फ्रेंससाठी उपस्थित राहू शकत नाही. हे मी 26 तारखेलाच कळविले होते. पण 28 तारखेला त्या दौऱ्याविषयी उगीच मोठी चर्चा घडवून आपण हा दौरा रद्द करायला लावला, असे हे चित्र लोकांसमोर आणण्याचा प्रकार काही नेते किंवा काही लोकांनी केला. परंतु, असे आरोप करत अध्यक्षांवर दबाव आणायचा प्रयत्न सुरू आहे. अध्यक्ष तुमच्या अशा गिधड धमक्यांना घाबरत नाहीत. त्यामुळे नियमानुसार कारवाई होणार.”

मी माझ्या मतदारसंघात स्वत: उतरून काम करतो : “मी इतर काही लोकांसारखा आपला मतदारसंघ विधानपरिषदेच्या आमदारांमार्फत चालवत नाही. मी माझ्या मतदारसंघात स्वत: उतरून काम करतो. मी आजही दिवसातील चार तास माझ्या कार्यालयात बसून माझ्या विभागातील लोकांचे प्रश्न सोडवितो. त्यामुळे ज्या लोकांना विधानसभा मतदारसंघ इतर लोकप्रतिनिधींच्या मार्फत चालवण्याची सवय आहे, त्यांना हे समजणार नाही की, लोकांमध्ये जाऊन कसे प्रश्न सोडवायचे ते. त्यामुळे त्यासंदर्भात भाष्य करायची गरज नाही. आपण आपल्या मदारसंघात जातो. विकासकामे का रखडलेली आहेत, त्यांची पाहणी करतो. जी लोक अडथळा आणत असतील, त्यांची कानउघडणी करतो, असाच तो एक प्रकार होता आणि त्याचा कोण विपरित अर्थ काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या लोकांना त्याबद्दल शुभेच्छा. या प्रयत्नातून अध्यक्षांवर कोणताही दबाव पडणार नाही. हे मी परत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो,” असे म्हणत राहुल नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.

हेही वाचा -

  1. Guardian Minister : राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरले! अजित पवारांना 'या' जिल्ह्याची जबाबदारी
  2. Nanded Patients Death Case : 'त्या' प्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर गुन्हा दाखल; डॉक्टर्सनी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा दिला होता इशारा
  3. Nagpur Hospital Death : राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, नागपुरात २४ तासात २५ रुग्ण दगावले
Last Updated : Oct 4, 2023, 6:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.