ETV Bharat / state

Radhakrishna Vikhe Patil: सरकार खरेच लोणी आयात करणार का? दुग्धविकास मंत्र्यांनी 'हे' दिले उत्तर

author img

By

Published : Apr 7, 2023, 10:33 AM IST

Updated : Apr 7, 2023, 10:42 AM IST

शरद पवार यांच्यासारख्या केंद्रात कृषिमंत्री राहिलेल्या व्यक्तीने वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारित शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवू नये, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. परदेशातून बटर आयात केल्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल असे ट्विट शरद पवार यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर विखे पाटील बोलत होते.

Radhakrishna Vikhe Patil
दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शरद पवारांनी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये

मुंबई: दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली जात आहे. यात तथ्य नसल्याचे मंत्री विखे पाटलांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. बटर आयातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर काहीच फरक पडणार नाही, असा निर्वाळा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. शरद पवारांनी केलेल्या ट्वीट संदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते.




शरद पवारांनी संभ्रम पसरवू नये: केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीने केवळ वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारे ट्विट न करता, केंद्रीय सचिवांशी चर्चा केली असती अथवा राज्यातील मंत्र्यांशी चर्चा केली असती तरी या संदर्भातील माहिती त्यांना उपलब्ध झाली असती. मात्र असे न करता त्यांनी केलेल्या ट्विटमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असू शकतो. शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण होऊ शकते. वास्तविक प्रदेशातून बटर आयात केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा फटका राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडणार नाही. अथवा येथल्या दूध संघांनाही त्याचा फटका बसणार नाही. कारण आपल्याकडे असे किती दूध उत्पादक संघ आहेत जे बटर किंवा अन्य उपपदार्थ मोठ्या प्रमाणात तयार करतात. हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता नाही तर तो संपूर्ण देशासाठी असतो.

शेतकऱ्यांना घाबरवू नये: देशातील अन्य राज्यातील परिस्थिती लंपी आजारामुळे बिकट झाली आहे. अशा राज्यांमध्ये बटर आयात केल्यास तेथील दूध उत्पादकांना काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या म्हणण्यामध्ये कुठलीही तथ्य नाही. त्यांनी नाहक शेतकऱ्यांना घाबरवू नये. यासंदर्भात 17 तारखेला दिल्लीमध्ये बैठक असून त्यावेळी विस्तृत चर्चा होईल. मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागेल. अशी परिस्थिती नसल्याचा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.



तहसीलदारांचा संप मिटला: तहसीलदारांच्या आणि नायब तहसीलदारांच्या ग्रेड पे संदर्भात काही प्रश्न होता. यासंदर्भात आम्ही यापूर्वी विनंती केली होती. मात्र तिचा विचार झाला नव्हता. यावेळी आम्ही पुन्हा एकदा यासंदर्भामध्ये विनंती केली असून, तसा प्रस्ताव राज्याचे वित्तमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी मान्य केला आहे. त्यामुळे याबाबतीतला तोडगा निघाला असून संप मागे घेतला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.



बागेश्वर बाबावर कारवाई हवीच: बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबा यांच्या संदर्भात काढलेल्या उद्गाराचा आपण यापूर्वीच तीव्र शब्दात निषेध केला आहे. खरंतर अशा वाचाळ लोकांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. राज्य सरकारने त्याच्यावर कारवाई करावी या भूमीकेवर आपण ठाम आहोत. आधी वाचाळपणा करायचा आणि नंतर माफी मागायची हे प्रकार योग्य नाहीत, असेही विखे पाटील म्हणाले.

हेही वाचा: SSC question paper leak case पेपर फुटी प्रकरणात तेलंगणाचे भाजप अध्यक्ष संजय बंदी यांना अखेर जामीन

Last Updated : Apr 7, 2023, 10:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.