ETV Bharat / state

PM Modi Birthday Special: मोदींना वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा! रबर स्टॅम्पच्या साहाय्यानं साकारलंय पंतप्रधानांचं पोर्ट्रेट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 9:06 PM IST

PM Modi Birthday Special : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मुंबईतील एका अवलियानं चक्क रबर स्टॅम्पच्या साहाय्यानं मोदींचं पोर्ट्रेट साकारलंय. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (portrait of modi with rubber stamps)

PM Modi Birthday Special
रबर स्टॅन्डच्या साहाय्यानं साकारलं पंतप्रधानांचं पोर्ट्रेट

निलेश चव्हाणची प्रतिक्रिया

मुंबई PM Modi Birthday Special : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. एका बाजूला भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या विभागात विविध कार्यक्रम घेत आहेत. तर, दुसरीकडे देशातील कलाकार देखील आपल्या कलेच्या माध्यमातून पंतप्रधानांना शुभेच्छा देण्याच्या प्रयत्नात आहेत. असाच काहीसा प्रयत्न मुंबईतील निलेश चव्हाण या कलाकारानं केलाय. निलेश चव्हाण या तरुण कलाकारानं चक्क रबर स्टॅम्पच्या साहाय्यानं 17 सप्टेंबर 2023 या तारखेचे रबर स्टॅम्प शिक्के मारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोर्ट्रेट साकारलंय. (portrait of modi with rubber stamps)


एकूण 1562 शीक्के : निलेश चव्हाण हा मुंबईच्या विक्रोळी भागात राहणारा एक मराठी तरुण कलाकार आहे. या कलाकारानं स्टॅम्पिंग मशीनच्या साहाय्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्म दिनांक 17 सप्टेंबर ही तारीख स्टॅम्प करून पंतप्रधानांचं पोर्ट्रेट साकारलंय. निलेशने दिलेल्या माहितीनुसार, ही कलाकृती 24 बाय 36 इंच आकाराची आहे. हे चित्र पूर्ण करण्यासाठी निलेशला 17 सप्टेंबर 2023 या तारखेचे एकूण 1562 वेळा शीक्के मारावे लागले. तर, ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी निलेश यांना एक तास 10 मिनिटे इतका वेळ लागलाय. त्यामुळं या कलाकृतीची नोंद आता 'वर्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया'मध्ये झालीय. (Nilesh Chavan created portrait of modi)


शिक्यांच्या मदतीनं चित्र काढण्याची संकल्पना : कलाकृतीबाबत सांगताना निलेश चव्हाण म्हणाला की, मी एका जाहिरात कंपनीमध्ये काम करतो. तिथं आम्हाला सातत्यानं काहीतरी नवनवीन करावं लागत असतं. नवनवीन कल्पना द्याव्या लागत असतात. असंच काम करत असताना मला शिक्यांच्या मदतीनं चित्र काढण्याची संकल्पना सुचली. त्यानंतर मी सुरुवातीला दोन पोर्ट्रेट काढून पाहिलं, आणि त्यात मला यश आलं. आता यात आणखी काहीतरी करायचं याचा विचार करत होतो. तेव्हा आपल्या पंतप्रधानांचा वाढदिवस 17 तारखेला असल्याचं माझ्या लक्षात आलं. मग मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोर्ट्रेट काढण्याचा निर्णय घेतला.


सोशल मीडियावर कलाकृती व्हायरल : निलेशनं सांगितलंय की, मी हे चित्र काढलं. त्याचं सध्या सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे. पण, माझी इच्छा आहे की, हे चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतदेखील पोहोचावं. मी त्यांना हे पोर्ट्रेट एक भेट म्हणून द्यावं. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर ही कलाकृती व्हायरल होतेय. नेटकऱ्यांकडून कलाकार निलेश चव्हाण यांचं कौतुक केलं जातंय.

हेही वाचा :

  1. PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अकरा सुत्री कार्यक्रम; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
  2. Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या संस्कृतमध्ये शुभेच्छा, Watch Video
  3. Grain Portrait Of PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धान्यापासून साकारलं भव्य 'पोर्ट्रेट'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.