ETV Bharat / state

Mansoon Arrived In Maharashtra: खुशखबर! महाराष्ट्रात मान्सून दाखल

author img

By

Published : Jun 11, 2023, 3:52 PM IST

Updated : Jun 11, 2023, 4:06 PM IST

नैऋत्य मान्सूनचे आज 11 जूनला महाराष्ट्रात आगमन झाले. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा‌ व तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशचा‌ काही भाग या पावसाने व्यापला.

Mansoon Arrived In Maharashtra
महाराष्ट्रात मान्सून दाखल

मुंबई: दक्षिण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. ८ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा चार ते पाच दिवस उशिरा आलेला आहे.

  • 11 Jun,आज राज्यात द.कोकणात व द.म. महाराष्ट्रात #मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढच्या 4,5 दिवसात #मेघगर्जनेसह पावसाची (Thunderstorms with gusty winds & rains) शक्यता अनेक ठिकाणी आहे व पिवळा इशारा देण्यात आला आहे. (३ व ४ दिवसासाठी इशारे सारखेच)@RMC_Mumbai @imdnagpur @ClimateImd pic.twitter.com/0ROPYKF64l

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाच दिवस उशिराने आगमन: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे. मान्सून दाखल होण्याचा दरवर्षीचा अंदाज पाहता यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरानं दाखल झाला आहे.

बिपरजॉय वादळामुळे मान्सून उशिरा: महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मान्सून कधी दाखल होणार याची वाट पाहत होते. अखेर राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रात आज म्हणजे ११ जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात रत्नागिरीपर्यंत मान्सून पोहोचला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता. केरळमध्ये मान्सून १ जूनला दाखल होतो. त्यानंतर मान्सून ७ जूनपर्यंत दाखल होतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे मान्सूनचे आगमन उशिराने झाले.

शेतीच्या कामांना वेग: खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून पूर्वतयारी सुरू आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मशागतीची काम करत आहेत. मान्सूनचे आगमन दक्षिण महाराष्ट्रात झाल्याने शेतीच्या कामांना वेग येणार आहे. गतवर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्याला यंदाच्या मान्सूनकडून अपेक्षा आहेत. मान्सूनचा पाऊस व्यवस्थित झाल्यास राज्यातील शेतकरी शेतीतून भरघोस उत्पन्न काढू शकतात. त्यामुळे यंदाचा मान्सून शेतकऱ्यांना तारणारा ठरतो, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ठरणार आहे.

हेही वाचा:

  1. british soldier news : तापमान सहन होईना! प्रिन्स विल्यमसमोर परेड सुरू असताना ब्रिटीश सैनिकाला आली भोवळ
  2. Cyclonic Storm Biparjoy :चक्रीवादळ बिपरजॉयची अत्यंत तीव्र चक्री वादळात रुपांतर होण्याची शक्यता; मुंबईने अनुभवला सर्वात जास्त उष्ण दिवस
Last Updated : Jun 11, 2023, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.