ETV Bharat / state

‘असा’ झाला होता 26/11 चा दहशतवादी हल्ला; अनेकांचे जीव वाचवणारा छोटू चायवालाने सांगितल्या कटू आठवणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 5:16 PM IST

Updated : Nov 26, 2023, 6:35 AM IST

Mumbai Terror Attack : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यास 15 वर्षे पूर्ण होत आहेत. या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचे जीव वाचवणारा छोटू चायवाला (Chhotu chaiwala) यांनी पंधरा वर्षांपूर्वीचा त्या कटू आठवणी 'ई टीव्ही भारत'शी सांगितल्या आहेत.

Chotu chaiwala On Mumbai Terror Attack
दहशतवादी हल्ल्यात अनेकांचे जीव वाचवणारा छोटू चायवाला

प्रतिक्रिया देताना छोटू चायवाला

मुंबई Mumbai Terror Attack : मुंबई शहरात भीषण दहशतवादी हल्ला झालेल्या याला 15 वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) च्या बाजूला असलेल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटल समोरील छोटू चायवाला म्हणून प्रसिद्ध असलेला मोहम्मद तौफीक शेख (Mohammed Taufeeq Sheikh) हा 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात थोडक्यात बचावला होता. छोटू चायवालाने सांगितलं की, त्याला अजूनही ती काळी रात्र आठवते, जेव्हा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब (Ajmal Kasab) आणि इस्माईल खान (Ismail Khan) या क्रूर दहशतवाद्यांनी लोकांवर बेछूट गोळीबार करून त्यांना ठार केलं होतं. तर अनेक जण जखमी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 21 ते 26 येथे चहाचे पैसे गोळा करण्यासाठी गेलो असताना, माझा तर जीवच जाणार होता. पण हजारो नागरिकांचे जीव मला वाचवता आले. पंधरा वर्षांपूर्वीचा त्या कटू आठवणी छोटू चायवाला याच्यासमोर जणू जिवंत झाल्या. तर छोटूच्या 26/11 च्या शौर्यामुळं त्याला 27 पुरस्कार आणि काही आर्थिक मदत मिळाली होती.


असा घडला प्रसंग : छोटू चायवालानं सांगितलं की, "मी दिवसभराचे चहाचे पैसे गोळा करायला रात्री 9 वाजताच्या सुमारास गेलो होतो. प्लॅटफॉर्म नंबर 21 ते 26 येथे मला पैसे गोळा करण्यासाठी जायचे होतं. तेव्हा मला बंदुकीच्या गोळ्या ऐकू आल्या. मला वाटलं की, ते फटाके आहेत. त्याचवेळी भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेट सामने सुरू होते. पुढच्याच क्षणी मला स्फोट आणि बंदुकीच्या गोळ्या ऐकू आल्या. मी आवाज कसला येतो हे पाहण्यासाठी गेलो तेव्हा मला दिसलं की, दोन माणसे मोठ्या बंदुकींनी सज्ज होते. सुरुवातीला वाटलं कोणी कमांडो आहे की काय, ते लोकांना निर्दयीपणे मारत होते. एका क्षणासाठी मला वाटलं की, मीही मरेन म्हणून मी माझ्या पत्नीला फोन करून सांगितलं की मी घरी परत येऊ शकणार नाही."

मी दिवसभराचे चहाचे पैसे गोळा करायला रात्री 9 वाजताच्या सुमारास गेलो होतो. प्लॅटफॉर्म नंबर 21 ते 26 येथे मला पैसे गोळा करण्यासाठी जायचे होतं. तेव्हा मला बंदुकीच्या गोळ्या ऐकू आल्या. मी आवाज कसला येतो हे पाहण्यासाठी गेलो तेव्हा दहशतवादी लोकांना निर्दयीपणे मारत होते. एका क्षणासाठी मला वाटलं की, मीही मरेन म्हणून मी माझ्या पत्नीला फोन करून सांगितलं की मी घरी परत येऊ शकणार नाही. त्यावेळी मी थोडक्यात बचावलेला होता. मी बिहारच्या डुंमरी गावातील आहे.आईचं निधन झाल्यानंतर दहा वर्षाचा असताना बिहार सोडून मुंबई आलो. ते आता 39 वर्षाचा होईपर्यंत मुंबईतच आहे. माझ्या दोन्ही मुली सातवी आणि नववी इयत्तेत शिकत आहेत. रेल्वे आणि राज्य सरकारने मदतीची अनेक आश्वासनं दिली. मात्र ती पूर्ण केलीच नाहीत. मुंबईत झालेला हा भयावह हल्ला इतर कुठेही परत होऊ नये. - मोहम्मद तौफीक शेख


छोटू चायवालाने अशी केली मदत : "गोळीबाराचा आवाज येत होता तेव्हा मी तिकीट काउंटर जवळ असलेल्या मेडिकल जवळ उभा होतो. माझ्यासोबत उभा असलेल्या मंजुला मी भारत मॅच जिंकला म्हणून फटाके वाजवत आहेत असं सांगत होतो. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अतिशय गंभीर होती. मी आरडाओरडा सुरू केला बॅगेत बॉम्ब आहे. त्यावेळी अनेक जण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकामधून बाहेर पडले. जवळपास 75 टक्के प्रवासी बाहेर निघाले आणि पंचवीस टक्के प्रवासी आत अडकले होते. आम्ही आठ ते दहा जाणार तिकीट काउंटरमध्ये होतो. तिकीट काउंटर समोर कसाब आला आणि त्याने बेछूट गोळ्या झाडल्या. आम्ही जिथे तिकीट काउंटरमध्ये उभे होतो, त्या तिकीट काउंटरची काच आणि टेबल फुटलं. काचेचा तुकडा स्टेशन मास्टरच्या गळ्याजवळ अडकला. एस. एन जाधव असं स्टेशन मास्टरचं नाव होतं. नंतर मी जिवाची बाजी लावून असहाय्य आणि जखमी लोकांना पाहिल्यानंतर, मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी हात गाडी वापरली. हात गाडीवरून अनेक जखमी लोकांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सीएसटी स्थानकाच्या मागच्या बाजूने भरती केलं. तर जखमी रेल्वे स्टेशन मास्टर यांना भायखळा येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं." या शब्दांत छोटू चायवालाने संपूर्ण थरार घटनाक्रम उलगडून दाखवला.

हेही वाचा -

  1. Mumbai Terror Attack : कसाबच्या हल्ल्यातून 'हे' नसते तर आम्ही बचावलो नसतो; कसाबला पकडण्याचा थरार
  2. Shiv Sena Burnt Pakistan Flag : भारतीय जवानांवरील हल्ल्याचा शिवसेनेकडून निषेध, पाकिस्तानचा झेंडा जाळला
  3. Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण; तहव्वूर राणाविरोधात पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र
Last Updated : Nov 26, 2023, 6:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.