ETV Bharat / state

MLA Sada Sarvankar Claimed : 'मातोश्री'वरून होता मनोहर जोशींच्या घरावर हल्ला करण्याचा आदेश; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 8:51 AM IST

Updated : Sep 11, 2023, 9:30 AM IST

माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रवृत्त केल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेच्या एका आमदारानं केलाय .त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच जोशी यांच घर जाळण्यास प्रेट्रोल घेऊन जाण्यासही मला सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

Etv Bharat
मनोहर जोशी

मुंबई - MLA Sada Sarvankar Claimed : 2009 मध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला (Attack on Manohar Joshi House) करण्यासाठी आपल्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रवृत्त केलं होतं, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केलाय. त्यामुळं आता चर्चांना उधाण आलंय. एका कार्यक्रमात बोलताना सदा सरवणकर यांनी हा गंभीर आरोप केलाय.

सदा सरवणकर यांचा गंभीर आरोप - मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून, ते मुख्यमंत्रीही राहिले होते. त्यांच्या घरावर हल्ला करण्यास मला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रवृत्त केलं होतं. 2009 मध्ये मला तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यामुळं मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील मनोहर जोशी यांच्या घरावर काही शिवसेना कार्यकर्त्यांनी सप्टेंबर 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी हल्ला केला होता. तुमचं तिकीट मनोहर जोशींमुळंच कापलं आहे. त्यामुळं तुम्ही त्यांच्या घरावर हल्ला करा, असं मला मला सांगण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केलाय.

मनोहर जोशींचं घर जाळण्यास सांगितलं - एका जाहीर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी मला मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाण्यास सांगितलं होतं. मी मातोश्रीवर गेलो त्यावेळी तुमचं तिकीट मनोहर जोशी यांनी कापलं, असे मला सांगण्यात आलं. त्यामुळं तुम्ही त्यांच्या घरावर हल्ला करा, असा निरोप मला दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी मला फोन केला. त्यावेळी संजय राऊत मला म्हणाले की, मनोहर जोशी यांच्या घराजवळ जाताना पेट्रोल पंप लागतो, तिथून पेट्रोल घेऊन त्यांचं घर पूर्ण जाळून टाका, काही शिल्लक ठेऊ नका, असे सांगितले. त्यामुळेच आपण मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केला, मातोश्रीचा आदेश आम्ही पाळला, असं सदा सरवणकर यांनी सांगत एकच खळबळ उडवून दिली.

ठाकरे, राऊतांकडून प्रतिक्रिया नाही - आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, हा गंभीर आरोप असल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. ajit pawar on sada sarvankar controversy महाराष्ट्रात उत्तरप्रदेश, बिहारसारखी गुंडगिरी माजवण्याचा प्रयत्न होतोय का? -अजित पवार
  2. Arvind Sawant Vs Sada Sarvankar दादरमध्ये नेमका काय राडा झाला? अरविंद सावंत -सदा सरवणकर यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी
  3. Sada Saravankar Pistol Seized : दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक केली जप्त ; पिता-पुत्रांना बजावले समन्स
Last Updated : Sep 11, 2023, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.