ETV Bharat / state

Ganesh Visarjan 2023: गणेश विसर्जनाला गालबोट, गुहागरमध्ये अपघातात दोन जणांचा मृत्यू, नाशिकमध्ये नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 10:06 PM IST

गुहागरमध्ये गणेश मिरवणुकीत टेम्पो घुसल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये विसर्जनादरम्यान नदीपात्रात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. तर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला.

Ganesh Visarjan 2023
Ganesh Visarjan 2023

मुंबई: गणेश विसर्जनाची धामधुम असताना गुहागरमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट लागले. पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना घडली आहे. विसर्जनासाठी आलेल्या टेम्पोचे मिरवणुकीत ब्रेक फेल झाले. विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसल्यानं 5 जण जखमी झाले आहेत. तर ड्रायव्हरसह एकाचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात करण्यात आलं दाखल करण्यात आलं.

  • नाशिक शहरात गणपती विसर्जन दरम्यान नदी पात्रात पाच जण बुडाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. नाशिकरोड येथे गणपती विसर्जन दरम्यान वालदेवी नदीपात्रात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात दोन महाविद्यालयीन तरुणाचा समावेश आहे. तर गोदावरी नदीत तीन जण बुडाले असल्याची माहिती समोर येत आहे.

दोघे जण बुडून वाहून गेले- सिन्नर फाटा चेहडी शिव येथील एका या इमारतीमधील सार्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जनसाठी प्रसाद सुनील दराडे हा आपला मित्र रोहित वैद्यनाथ नागरगोजे चेहडी येथील संगमेशर येथे गेले होते. यावेळी प्रसाद दराडे हा पाण्याजवळ गेल्यानं त्याचा पाय घसरून पाण्यात पडला. पोहता येत नसल्यानं तो पाण्यात बुडू लागला. तेव्हा शेजारी असलेल्या रोहित नागरगोजे यानं त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं दोघे जण बुडून वाहून गेले. तर दुसरी घटना वडनेर येथील महादेव मंदिर येथे घडली आहे.

गोदावरी नदीत दोन जण बुडाले- वडनेर येथे वालदेवी नदी घाटावर गणपती विसर्जन करीत असतांना महादेव मंदिर लहान पुलाजवळ हेमंत कैलास सातपुते हा विवाहित तरुण वालदेवी नदी पात्रात बुडाला. पाण्याचा मोठा प्रवाह असल्यानं व रात्र झाल्यानं शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. दोन महाविद्यालय तर एक विवाहित तरुणचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर गोदावरी नदीत दोन जण बुडाले असल्याची माहिती समोर येत आहे.

वीज कोसळून स्वयंसेवक ठार- मुंबईत सर्वत्र गणेश विसर्जन सुरू असताना मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावरून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका स्वयंसेवकावर वीज पडल्याची दुर्घटना घडली. यानंतर त्या तरुणाला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे कूपर रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा-

  1. Ganesh Visarjan 2023 : जीव धोक्यात घालून गणरायाला निरोप; पहा व्हिडिओ
  2. Ganesh Visarjan 2023: 'मी माझ्या बाप्पाला निरोप द्यायला आलोय; गणपती काय, ईद काय आम्ही एकत्र असतो' - मुस्लिम भक्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.