ETV Bharat / state

Breaking News : जलसंधारण अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने केली अटक

author img

By

Published : Feb 6, 2023, 7:08 AM IST

Updated : Feb 6, 2023, 9:52 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

21:50 February 06

जलसंधारण अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने केली अटक

औरंगाबाद - जिल्ह्यात लाच लुचपत विभागाने केलेल्या एका मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे. जलसंधारण विभागातील अधिकाऱ्याला साडेआठ लाखांची लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. ऋषिकेश देशमुख (उपविभागीय अधिकारी वैजापूर जलसंधारण विभाग) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली होती. मात्र तक्रारदार यांची लाच घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. दरम्यान एसीबीने लावलेल्या ट्रॅपनुसार, देशमुख यांना साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.

21:29 February 06

वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; 31 जखमी, 8 गंभीर

चंद्रपूर : नामकरणविधीसाठी गावकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाल्याने 31 जण जखमी झाले, यापैकी आठ जण गंभीर आहेत. ही घटना ब्रम्हपुरी येथील टिळक नगर जवळ घडली. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. गंभीर रुग्णांना चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर इतरांवर ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

21:01 February 06

जयंत पाटलांपाठोपाठ मुलाची साखर कारखान्यातून राजकीय एंट्री; प्रतीक पाटलांची कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सुपुत्र प्रतीक पाटील यांचे राजकारणात एंट्री झाली आहे, राजराम बापु साखर कारखान्याच्या संचालक पदी प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

19:51 February 06

राष्ट्रपित्यांचे विचार पायदळी तुडवण्याचा प्रयत्न होत आहे- प्रवीण देशमुख

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी या महामानवांचे विचार प्रेरणादायी आहेत. राष्ट्रपिता विचार पायदळी तुडवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याची खंत मराठा सेवा संघाचे प्रवक्ता प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंतांनी राष्ट्रपिता यांच्या विचारातील समन्वय या विषयावर ते बोलत होते. येथील शेगाव नाका स्थित अभियंता भवन येथे ४ ते ५ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या पहिले राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन आज पार पडले. या दोन दिवसीय साहित्य संमेलनात विचारवंत, लेखक,व्याख्याते, समीक्षक, कवी, साहीत्यिक यांची मांदियाळी होती. यावेळी राष्ट्रसंताच्या समग्र साहित्याचे अभ्यासपूर्ण चिंतन केले जात असल्याचे चित्र दिसून आले.

19:38 February 06

तुर्की सिरियातील भूकंपामुळे मृतांचा आकडा 1900च्यावर, मध्यरात्री काळाचा घाला

तुर्कीमधील भूकंपाने किल्लारीच्या भूकंपाच्या आठवणी जाग्या होत आहेत. आताच आलेल्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार भूकंपामुळे मृतांचा आकडा 1900च्यावर गेला आहे. तिसरा भूकंप झाल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीच तुर्की आणि सिरियातील लोकांच्यावर काळाने जणू घाला घातला आहे.

#अपडेट | तुर्कस्तान आणि सीरियातील विनाशकारी भूकंपांमुळे मृतांची संख्या 1,900 वर पोहोचली आहे, एपीच्या अहवालात

18:49 February 06

तुर्कीमध्ये तिसरा मोठा भूकंपाचा धक्का, मध्य तुर्की 6 रिष्टरच्या भूकंपाने पुन्हा हादरली

तुर्कीमध्ये तिसरा मोठा भूकंपाचा धक्का बसला आहे. USGS ने म्हटले आहे की, मध्य तुर्कीमध्ये 6.0 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला आहे. 24 तासांपेक्षा कमी कालावधीत दोन शक्तिशाली भूकंपानंतर तुर्कीमधील हा तिसरा भूकंप आहे.

18:34 February 06

पोप फ्रान्सिस पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता

रोम [इटली] : पोप फ्रान्सिस वर्षी भारताला भेट देण्याची योजना आखत आहेत. व्हॅटिकन न्यूजनुसार 2023 नंतर मंगोलियालाही ते जाण्याची शक्यता आहे. पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या आगामी प्रवासाच्या वेळापत्रकाची रूपरेषा दक्षिण सुदानमधून रोमला परत येताना दिली. पुढील वर्षी भारताला भेद देण्याचे नियोजन आहे. मात्र याबाबत अजून नश्चित दौरा कधी असेल याचे नियोजन झाल्याची पुष्टी मात्र देण्यात आलेली नाही.

17:46 February 06

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली खासदार गिरीश बापट यांची भेट

पुणे:- कसबा पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असेल आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आहे.या भेटीत खासदार गिरीश बापट तुम्हाला हातात हात देत आहे का अस नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की त्यांच्याजवळ पंजा आहे की असा मिश्किल टोला यावेळी पटोले यांनी लगावला आहे.

16:45 February 06

तुर्कीमधील कहरामनमारा प्रांतात ७.६ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंपाचा धक्का

तुर्कीच्या वृत्तसंस्थेने देशाच्या आपत्ती एजन्सीचा हवाला देत दक्षिण तुर्कीमधील कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात ७.६ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंपाचा धक्का बसला आहे.

16:34 February 06

जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱयाला दहा लाखांचे इनाम जाहीर करणाऱयावर गुन्हा दाखल करा - राष्ट्रवादी

ठाणे - जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱयाला दहा लाखांचे इनाम जाहीर करणारा जालन्याचा भाजयुमो अध्यक्ष कपिल देहेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार, शहराध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसची नौपाडा पोलीस ठाण्यात धडक गुन्हा दाखल करून कारवाईची केली मागणी

16:14 February 06

तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये शक्तिशाली भूकंप; मृतांचा आकडा 1300 वर

नवी दिल्ली - तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये आज झालेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपात मृतांची संख्या १३०० झाली आहे. शेकडो नागरिक अजूनही अडकले आहेत.

15:51 February 06

अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अरबी भाषेच्या शिक्षकाला मुंबईत अटक

मुंबई - ओशिवरा पोलिसांनी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अरबी भाषेच्या शिक्षकाला अटक केली आहे.

15:44 February 06

कसबा मतदारसंघात पोस्टरबाजी;.कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भाजपने माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. पण आता टिळकांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने घराबाहेरील उमेदवार दिल्याने मोठी नाराजी उफाळल्याचे चित्र आहे.

15:35 February 06

माँटी देसाई यांची नेपाळच्या पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

नवी दिल्ली - भारताच्या माँटी देसाई यांची नेपाळच्या पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. नेपाळच्या क्रिकेट संघटनेने ही माहिती दिली.

15:03 February 06

आयएनएस विक्रांतवर भारतीय फायटर प्लेनचे लँडिंग

नवी दिल्ली - भारतीय नौदलाने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. नौदल वैमानिकांनी INS विक्रांतवर LCA (नेव्ही) चे लँडिंग केले. यामुळे स्वदेशी लढाऊ विमानांसह स्वदेशी विमानवाहू जहाज तयार करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे.

14:45 February 06

..... तर राम मंदिराला आगामी 50 वर्षात मोठा धोका - तोगडिया

नागपूर - अयोध्येत राम मंदिर निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. हे मंदिर २०२४ पर्यंत बांधून पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. मात्र, लोकसंख्येचे असंतुलन रोखले नाही तर या मंदिराला आगामी 50 वर्षात मोठा धोका पोहोचू शकतो असा इशारा विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. यातून त्यांनी नेमका कुणावर निशाणा साधला आहे ते समजू शकते.

14:37 February 06

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोनवर मुंबईत काही ठिकाणी बंदी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुंबई पोलीस आणि गेल्यावेळेससुद्धा ठराविक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पश्चिम उपनगरात ठराविक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ड्रोन आणि उडान क्रियांवर बंदी घातली होती. त्याचप्रमाणे 10 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान देखील मुंबई पोलिसांनी ड्रोन आणि उडान क्रियांवर बंदी घातलेली आहे.

14:20 February 06

अदानी वादावर लोकसभा-राज्यसभेत गदारोळ, दिवसभरासाठी कामकाज तहकूब

नवी दिल्ली - अदानी वादावर विरोधी खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभा तसेच राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आता उद्या, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होईल.

14:05 February 06

तुर्कीमधील भूकंपाने हाहाकार, किमान 640 जणांचा मृत्यू

तुर्कीमधील भूकंपाने हाहाकार. सुरुवातीला आला होता 130 मृतांचा आकडा. आता नवीन माहितीनुसार किमान 640 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. आहे. मदतकार्य सुरू आहे. त्यामुळे आणखी काही मृतदेह हाती लागतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

13:50 February 06

मृत म्हणून पुरलेला रिक्षाचालक जिवंत सापडला..धक्कादाय प्रकाराने पालघर जिल्ह्यात खळबळ

पालघर जिल्ह्यात 60 वर्षीय ऑटो-रिक्षा चालक, ज्याला त्याच्या कुटुंबाने मृत समजले होते आणि पुरले होते, तो जिवंत सापडला आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. त्याची मित्रासोबतच्या गप्पांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.

13:37 February 06

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत ड्रोनवर बंदी

पंतप्रधान मोदी १० फेब्रुवारीला मुंबईत वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, विमानतळ पीएस, सहार पीएस, कुलाबा पीएस, एमआरए मार्ग पीएस, एमआयडीसी पीएस आणि अंधेरी पीएसच्या कार्यक्षेत्रात ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे.

12:36 February 06

समलिंगी जोडप्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आजच तातडीने सुनावणी

नवी दिल्ली - मानसोपचार तज्ज्ञांसोबत समुपदेशन सत्राला उपस्थित राहण्याचे निर्देश देणाऱ्या केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या समलिंगी जोडप्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय तातडीने सुनावणी देण्यास सहमती दाखवली आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, या याचिकेवर आज शेवटी सुनावणी होईल.

12:33 February 06

भारताकडे ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अभूतपूर्व संधी - मोदी

बंगळूरू - विकसित राष्ट्र बनण्याच्या संकल्पाने वाटचाल करणाऱ्या भारताकडे ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अभूतपूर्व संधी आहेत. कर्नाटकातील बेंगळुरू येथे इंडिया एनर्जी वीक 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. या संधींचा भारताने पुरेपूर वापर केला पाहिजे अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

11:50 February 06

Grammys 2023: Adele च्या 'Easy On Me' ला 'बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स'चा पुरस्कार

लॉस एंजेलिस : अ‍ॅडेल तिच्या 'इझी ऑन मी' गाण्यासाठी ग्रॅमी स्वीकारताना भावूक झाली होती. अ‍ॅडेलने 'बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स' प्रकारात हा पुरस्कार जिंकला. ड्वेन जॉन्सनने विजेते म्हणून तिच्या नावाची घोषणा केली.

11:46 February 06

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांचा शपथविधी

नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पाच नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली होती.

11:21 February 06

विरोधकांनी संसदेत घातला गोंधळ, राज्यसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित

अदानीच्या मुद्द्दयांवरून विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

10:15 February 06

विरोधी पक्ष आज संसदेत होणार आक्रमक, मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतली बैठक

विरोधी पक्ष - काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, बीआरएस, जद(यू), एसपी, सीपीएम, सीपीआय, केरळ काँग्रेस (जोस मणी), जेएमएम, आरएलडी, आरएसपी, आप, आययूएमएल, आरजेडी आणि शिवसेना यांची एलओपी मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये बैठक झाली. अदानी-हिंडेनबर्ग आणि इतर मुद्द्यांवर धोरण आखण्यासाठी विरोधी पक्षाकडून आक्रमकपणे आंदोलन करण्यात येणार आहेत.

09:27 February 06

गेल्या ६७ वर्षात कधीही नुकसान नाही, प्रथमच ५० हजार कोटींचे नुकसान- संजय राऊत

संसदेच्या अधिवेशनाबाबत आज विरोधी पक्षातील खासदारांची चर्चा आहे. अदानी घोटाळ्याविरोधात खासदार संसदेच्या प्रागंणात आंदोलन करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. गेल्या ६७ वर्षात कधीही नुकसान नाही, प्रथमच ५० हजार कोटींचे नुकसान झाल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

08:49 February 06

ट्विटरला दिवाळखोरीपासून वाचवावे लागले-एलॉन मस्क

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी गेल्या तीन महिन्यांला अत्यंत कठीण" म्हटले आहे. ट्विटरला दिवाळखोरीपासून वाचवावे लागले, असे त्यांनी म्हटले आहे.

08:48 February 06

भारतीय संगीतकार रिकी केज यांना तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार

भारतीय संगीतकार रिकी केज यांना तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार जाहीर झाला आहे. आत्ताच माझा तिसरा ग्रॅमी पुरस्कार जिंकला. अत्यंत आभारी आहे, मी नि:शब्द आहे! मी हा पुरस्कार भारताला समर्पित करतो, असे ट्विट रिकी केज यांनी केले.

08:48 February 06

तुर्कस्तानमध्ये भूकंपात 5 लोकांचा मृत्यू

तुर्कस्तानमध्ये भूकंपात 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 16 इमारती कोसळल्याचे तुर्कस्तानमधील सॅनलिउर्फाच्या महापौरांनी म्हटले आहे.

08:04 February 06

नागपूरमध्ये मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत

नागपूरमध्ये मेट्रोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत उद्यापासून मिळणार आहे. मेट्रोच्या प्रवासाचे दर तीनवेळा वाढविण्यात आले होते. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

07:18 February 06

तुर्कस्तानमध्ये ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप

तुर्कस्तानच्या नुरदागीपासून २३ किमी पूर्वेला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

07:16 February 06

जम्मुत जोशीमठसारखी स्थिती, शास्त्रज्ञांनी केली पाहणी

जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांच्या गटाने जम्मू येथील नई बस्ती, थात्री दोडा जिल्ह्याला भेट दिली. तेथील काही घरांना भेगा पडल्याने जोशीमठसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

07:15 February 06

भारत ऊर्जा सप्ताहाचे पंतप्रधान करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन करणार आहेत.

07:14 February 06

लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त, 6 फूट उंचीचे साकारले वाळूचे शिल्प

लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त, वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर 'भारतरत्न लता जी यांना श्रद्धांजली, मेरी आवाज ही पहलें है' संदेशासह 6 फूट उंच वाळूचे शिल्प तयार केले आहे.

06:32 February 06

Maharashtra Breaking News : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकरता उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबरोबरच राष्ट्रवादीने चिंचवडसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. राहुल कलाटेचे नाव आघाडीवर आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राज ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे आव्हान केले आहे.

Last Updated : Feb 6, 2023, 9:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.