ETV Bharat / state

Mohan Bhagwat on Caste : जात ही देवाने नाही तर पंडितांनी निर्माण केली; मोहन भागवत यांचे मोठे विधान

author img

By

Published : Feb 5, 2023, 10:25 PM IST

Updated : Feb 5, 2023, 10:55 PM IST

संत रोहिदासांच्या जयंती सोहळ्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाच्या धर्म आणि विषमता यावर आज (रविवारी) विवेचन आणि भाष्य केले. धर्म सोडू नका धर्म म्हणजे कर्मकांड असे नव्हे, हे रोहिदासांचे विचार आहेत. भारत जगात खरे रामराज्य साकार करू शकतो. भारताचे विश्वगुरु बनण्याकडे मार्गक्रमण सुरू आहे. संत शिरोमणी संत रोहिदास यांनी विषमतेवर प्रहार केला. मात्र आपला धर्म सोडला नाही. यावर डॉ. मोहन भागवत यांनी जोर दिला. संत रोहिदास यांच्या जयंती सोहळ्यानिमित्ताने ते बोलत होते. तसेच जात ही देवाने नाही तर पंडितांनी निर्माण केली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Etv Bharat
Etv Bharat

डॉ. मोहन भागवत यांची संत रोहिदास जयंती कार्यक्रमात उपस्थिती

मुंबई: राजधानीतील संत रोहिदास भवन यास 2016 साली गती मिळाली. नंतर 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या हस्ते पायाभरणी केली गेली होती. असंख्य अडचणी कोरोना महामारीमुळे काम रखडले. तळ मजला काम पूर्ण झाले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री द्वारा 10 कोटी रुपये मदत मिळाली. आणखीन 2 मजले कौशल्य विकास करण्यासाठी 5 कोटी रुपये ह्या शासनाने दिले. मात्र अद्याप भवनाचे काम पूर्ण झालेले नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईमधील चर्मकार समाजाने संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्ताने रोहिदास भवन संदर्भातील आपली मागणी देखील सार्वजनिकरित्या व्यक्त केली.

  • When we earn livelihood we've responsibility towards society. When every work is for society then how can any work be big or small or different?God has always said that everyone is equal for him & there's no caste, sect for him, it was made by priests which's wrong: Mohan Bhagwat pic.twitter.com/XqpW0A6j7b

    — ANI (@ANI) February 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोहन भागवत यांचे मोठे विधान - सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीवादावर मोठे विधान केले आहे. भागवत म्हणाले की, जात ही देवाने नाही तर पंडितांनी निर्माण केली आहे. मुंबईत रविदास जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते.

भारताचे विश्वगुरु बनण्याकडे मार्गक्रमण : सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढे भारताची प्राचीन सभ्यता परंपरा आणि संतांनी केलेले कार्य यावर काही भाष्य आणि विवेचन मांडले. त्यांनी सांगितले की, जगात खरे राम राज्य साकार करू शकतो. भारत विश्वगुरु बनण्याकडे मार्गक्रमण करीत आहे. औरंगजेब हा सर्व जनतेवर जुलून करीत होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिले. सर्व जनता ही ईश्वराची लेकरे आहेत. तू अत्याचार का करतोस. तू अत्याचार थांबव असे छत्रपती शिवरायांनी पत्रात लिहिले. हे उदाहरण डॉ. भागवत यांनी दिले.

  • Chhatrapati Shivaji Maharaj wrote letter to Aurangzeb after temple was destroyed in Kashi mentioning that Hindus & Muslims are children of one god & brutality on one of them is wrong & that his job is to respect everyone &if it isn't stopped then he'll use his sword:Mohan Bhagwat pic.twitter.com/fVy9Ji0b0g

    — ANI (@ANI) February 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धर्म न सोडण्याचे आवाहन : मोहन भागवत यांनी पुढे या संदर्भात तपशील भूमिका मांडली. धर्म सदा सर्वकाळ उपकारक असतो. धर्म सोडू नये. इहलोक व परलोक महत्त्वाचा तो धर्म सोडू नका. श्रेष्ठता जन्मावर नसते श्रेष्ठता गुणांवर असते. विषमतेतून आपण बाहेर पडले पाहिजे. हे विचार संविधान सभेत आपण ऐकले असेल. संतांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आले तरच खरे जीवन होय. श्रम करणाऱ्याचा सन्मान केलाच पाहिजे. श्रम, प्रतिष्ठा नसल्याने बेरोजगारी वाढते. आपल्या देशातील बेरोजगारीचे महत्त्वाचे कारण म्हणजे श्रमप्रतिष्ठा नाही. सरकारी नोकरी केवळ दहा टक्के आहे. जगातील कोणताही समाज 30 टक्केपेक्षा अधिक नोकरी देऊ शकत नाही, असे मोहन भागवत म्हणाले.

हेही वाचा : Naxalites killed BJP leader: नक्षलवाद्यांकडून भाजप नेत्याची निर्घृण हत्या.. घरच्यांसमोर कुऱ्हाडीने केले वार.. छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला

Last Updated : Feb 5, 2023, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.