ETV Bharat / state

सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ, ऑनलाईन तक्रारींपेक्षा हेल्पलाइनवर तक्रारींचा भडीमार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 10:52 PM IST

Cyber crime : राज्यभरात सायबर क्राईमच्या घटनात वाढ होत आहे. वीज बिल भरणे, तिकीट बुकिंग, बँक खात्यातील व्यवहार यासह अनेक गोष्टीसाठी इंटरनेटचा वापर केला जातो. त्यामुळं सायबर क्राईमसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

cyber crime
cyber crime

मुंबई Cyber crime : गेल्या तीन वर्षांत मुंबईसह राज्यात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. त्यामुळं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्र सायबर सेलकडे हेल्पलाइनच्या माध्यमातून राज्यभरातून तक्रारी येत आहेत.

दररोज 1 हजाराहून अधिक तक्रारी : याबाबत महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, 'सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर दररोज 1 हजाराहून अधिक फोन येत आहेत. त्यापैकी 300 ते 400 कॉलची गंभीरता पाहून गुन्हाची नोंद केली जाते'. गेल्या वर्षी या तक्रारींची संख्या 3 हजार 206 होती. मात्र, यावर्षी सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत असून, 16 हजार 166 तक्रारींचं गुन्ह्यात रुपांतर झालं आहे. गेल्या वर्षी याच तक्रारींचं गांभीर्य लक्षात घेऊन 3 हजार 206 गुन्हे दाखल झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सायबर तक्रारींमध्ये चौपट वाढ झाल्याचं दिसून येत आहे.


1930 या हेल्पलाइन क्रमांकावर करा तक्रार : गेल्या वर्षी महाराष्ट्र सायबर सेलच्या वेबसाइटवर एकूण 68 हजार 123 ऑनलाइन तक्रारी आल्या होत्या. यावर्षी तक्रारीचं प्रमाण कमी झालं असून 6 हजार 644 तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी दिली आहे. तक्रारदारांनी वेबसाईट ऐवजी 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार दाखल केल्यानं वेबसाईटवर तक्रारीची संख्या कमी दिसत आहे. कोणत्याही प्रकारचा सायबर क्राईम तुमच्यासोबत झाला असेल तर, तीन तासांच्या आत हेल्पलाईन क्रमांकावर किंवा ऑनलाइन तक्रार करण्याचं अवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. 'उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी काय दिवे लावले, पीएचडी करणं पक्ष बदलण्याइतकं सोपं नाही'
  2. लातूरच्या अमोल शिंदेची संसदेबाहेर घोषणाबाजी, शेतमजूर म्हणून करतो काम
  3. शिंदे समिती राज्य सरकारला दोन दिवसांत करणार अहवाल सादर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.