ETV Bharat / state

ग्राहकांना खुषखबर! AI च्या मदतीनं फेसबुकसह आयआयटी मुंबई करणार तक्रार निवारणासाठी मदत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 5:00 PM IST

Updated : Dec 4, 2023, 7:34 PM IST

IIT Mumbai Work : भारताच्या एकूणच 140 कोटी जनतेच्या ग्राहक प्रणाली आणि ग्राहक समाधानामध्ये सुधार, कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने आयआयटी मुंबई, फेसबुक (Facebook) आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (National Law School University) तसंच भारत सरकार ग्राहक विभाग यांनी संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. (IIT Mumbai) भारतभरात या संदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी (AI) 'आर्टिफिशिएल इंटेलिजन्स' यंत्रणा उभारून सुलभता आणण्याचा प्रयत्न असेल. (IIT Mumbai Work)

IIT Mumbai Work
मुंबई

कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी माहिती देताना प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य

मुंबई IIT Mumbai Work : फेसबुक, आयआयटी तसंच राष्ट्रीय विधी विद्यापीठ यांनी 'लार्ज लैंग्वेज मॉडेल' माध्यमातून ग्राहक तक्रार निवारण सुधारण्यासाठी सुरुवात केलेली आहे. भारताच्या सर्व राज्यांमध्ये शेकडो स्थानिक भाषा आहेत. त्या भाषांमध्ये प्रचंड प्रमाणात व्यवहार होतो. आपण आपल्या भाषेमध्ये मोबाईलवरून फेसबुकच्या लिंकवर किंवा त्या मोबाईल क्रमांकावर व्हॉइस टायपिंग करायचं किंवा हाताने टायपिंग करायचं आणि त्या सर्व भारतीय भाषांचा अनुवाद इंग्रजीमध्ये केला जाईल. इंग्रजीचा अनुवाद भारतीय भाषांमध्ये केला जाईल. त्यामधून ग्राहक तक्रार निवारण केलं जाईल. ग्राहक यातून मार्गदर्शन माहिती मदत मिळवू शकतात. हे सर्व मोबाईलवर घरबसल्या करता येईल.



तक्रार निवारणासाठी चॅटबॉट करणार मदत : यासंदर्भात आयआयटी मुंबईचे प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य म्हणाले की, समजा तुम्ही भारतात कुठल्याही ठिकाणी उभे आहात तुम्ही दुकानातून एखादं प्रॉडक्ट विकत घेतलं किंवा घर खरेदी करताय; पण तुम्हाला प्रॉडक्टबाबत तक्रार असेल, तर तुम्हाला तक्रार कुठे करायची ती तक्रार कशी करायची, तक्रार कोणत्या कायद्यांतर्गत करायची पद्धत काय असेल, सर्व बाबतीत 'आर्टिफिशल इंटेलिजन्स'च्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली जाईल.



कोणत्या कोर्टात जायचे हे सांगणार : आयआयटी मुंबईचे प्रा. पुष्पक भट्टाचार्य म्हणाले, सुरुवातीला इंग्रजीमध्ये आणि नंतर सर्व भारतीय भारतीय भाषांमध्ये मशीन लर्निंगद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कायदेशीर सल्ला देखील दिला जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवाबाबत तुम्ही समाधानी नाहीत. काही तक्रार असेल तर ग्राहक कोर्टात जायचं किंवा नाही किंवा तुम्हाला सत्र न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे किंवा नाही, हे देखील सांगितलं जाईल. तशी गरज असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, अशा सर्व बाबींमध्ये तुम्हाला माहिती द्वारे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून मार्गदर्शन दिले जाईल. ज्यामुळे तुमचा वेळ, श्रम आणि पैसा देखील वाचेल. इंटेलिजन्स चॅटबॉटच्या माध्यमातून ही मदत केली जाणार.

ग्राहक न्यायालयाला होणार मदत : ग्राहक न्यायालयात खटल्याची सुनावणी करताना, निकाल देताना याचा उपयोग होईल. मागील न्यायालयाचे संदर्भ, दाखले त्यात आवश्यक असतात. त्यात देखील आता मदत होईल. AI सर्वोच्च न्यायालयाचे किंवा कोणतेही मागील संदर्भ पटकन शोधून देऊ शकते, असे प्रा. पुष्पक भट्टाचार्य म्हणाले. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रोफेसर कृष्णा स्वामी म्हणाले की, अत्यंत क्रांतिकारक आणि परिवर्तन कार्य उपक्रम फेसबुक, नॅशनल युनिव्हर्सिटी आणि आयआयटी मुंबई सुरू करत आहे. त्यामुळे सामान्य भारतीयांच्या जगामध्ये गुणात्मक फरक येईल.

ग्राहकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती : ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह नवीन उपक्रमाबद्दल सांगतात, ग्राहकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. ग्राहक हक्काबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जनरेटिव्ह AI चा वापर केला जाईल. भारतीय ग्राहक आणि ग्राहक न्यायालये यांना सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी आयआयटी मुंबई, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, भारत सरकार संयुक्त उपक्रम सुरू करताहेत.


ग्राहक हितासाठी ऐतिहासिक निर्णय : मेटा फेसबुकचे उपाध्यक्ष जोएल कॅप्लान अमेरिकेतून म्हणतात, Metaने शोध संशोधन, मुक्त विज्ञान आणि शैक्षणिक आणि उद्योग भागिदारांसोबतच्या सहकार्य सुरू केले आहे. ग्राहक क्षेत्रात कायापालट करणारे तंत्रज्ञान आम्ही आणत आहोत. याचा फायदा ग्राहक न्यायालयाला देखील होईल. येत्या काळात AI चा प्रचंड वापर वाढेल. त्यात ग्राहकांच्या हितासाठी हा जागतिक प्रयत्न आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे.

हेही वाचा:

  1. शेअर बाजारावर भाजपाच्या विजयाचा इफेक्ट; सेन्सेक्स प्रथमच 68,000 पार, गुंतवणूकदारांनी 15 मिनिटांत कमावले 4 लाख कोटी
  2. निवडणुकीतील पराभवाचा संसदेत राग काढू नये; पंतप्रधानांचा विरोधकांना टोला
  3. शेतकऱ्यानं थेट न्यायालयातून मिळवली 'कर्जमाफी', 'या' योजनांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना घेता येणार लाभ
Last Updated : Dec 4, 2023, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.