ETV Bharat / state

Amruta Fadnavis Blackmail Case: अमृता फडणवीस लाच प्रकरणातील जयसिंघानीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; मध्यप्रदेश, गोव्यासह गुजरात पोलिसांचा लकडा

author img

By

Published : Apr 3, 2023, 12:45 PM IST

Updated : Apr 3, 2023, 2:21 PM IST

अमृता फडणवीस लाच प्रकरणात केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा अर्ज दाखल केला होता, तो अर्ज फेटाळला आहे. बुकी अनिल जयसिंघानीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. उच्च न्यायालयाने त्याला दिलासा नाकारला आहे. आता आणखी काही प्रकरणांमध्ये त्याच्या चौकशीसाठी विविध राज्यांचे पोलीस त्याच्या मागे लागले आहेत.

Amruta Fadnavis Blackmail Case
न्यायालय मुंबई

मुंबई : अमृता फडणवीस यांना लाच तसेच धमकी दिल्याच्या प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानीविरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. जयसिंघानीने त्याची केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. नंतर सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी त्याने धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. आज त्याच्या अर्जावर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.


जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बुकी अनिल जयसिंघानी याच्या वकिलांनी केली गेलेली अटक बेकायदेशीर असल्याची बाजू मांडली. मात्र उच्च न्यायालयाने ती बाजू अमान्य केली. त्याच्यावर असलेले असंख्य गुन्हे, अन उपलब्ध पुरावे पाहता त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. मात्र अतिरिक्त सत्र न्यायालय मुंबई येथे याबाबत शुक्रवारी देखील सुनावणी झाली. अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुजरात ईडीच्यावतीने त्याला ताब्यात देण्याची मागणी मंजूर केली.


लाच देण्याचा प्रयत्न : बुकी अनिल जयसिंघानी हा गेल्या दहा वर्षापासून विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस दलाला सापडला नव्हता. मात्र अमृता फडणवीस यांना आपल्या मुलीच्याद्वारे फोन कॉल, व्हॉट्सअप माध्यमातून ओळख वाढवत त्यांना लाच तसेच खंडणी देण्याचाही प्रयत्न केला, असा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन त्याला अटक केली होती. त्याबाबत मुंबई सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुरू असतानाच मध्य प्रदेश गोवा आणि गुजरात येथील ईडीने मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये बुकी अनिल जयसिंघानी याला ताब्यात देण्याचा अर्ज केला. तो अर्ज अखेर आज अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.



गुजरात ईडीची मागणी मंजूर : अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये गुजरातच्या अंमलबजावणी संचलनालय यांनी बुकी अनिल जयसिंघानीची कोठडी हवी आहे. चौकशीसाठी ताब्यात देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्याआधी गोवा पोलीस तसेच मध्य प्रदेश पोलीस यांनी देखील त्याचा ताबा घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे आधी मध्य प्रदेश पोलिसांकडून त्याची चौकशी केली जाईल, ती पूर्ण झाल्यानंतर गोवा पोलीस त्याचा ताबा घेतील. त्यानंतर गुजरातमधील ईडी बुकी अनिल जयसिंघानीचा ताबा घेईल. मुंबई अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. डी. अलमले यांनी गुजरात ईडीची मागणी मंजूर केली.

हेही वाचा : Devendra Fadnavis On Amruta Fadnavis : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा, पाहा संपूर्ण व्हिडिओ

Last Updated : Apr 3, 2023, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.