ETV Bharat / state

Shooting Training : बंदुक परवाना हवाय? घ्या पोलिसांकडूनच प्रशिक्षण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 9:17 PM IST

Shooting Training : स्वतःची सुरक्षा किंवा प्राण्यांचा हल्ला होण्याची भीती या दोन कारणांसाठी शस्त्र परवाना दिला जातो. आता शस्त्र परवाना मिळवण्यासाठी एक अट महत्त्वाची आहे. ती म्हणजे परवाना देताना संबंधित परवानाधारकाला हत्यारासंबंधीचं प्रशिक्षण घेतलेलं गरजेचं आहे. त्यासाठी पोलिसांकडून आता तीन दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

Shooting Training
राज्यात बंदुकीचा परवाना

मुंबई Shooting Training : आपल्या जीविताला धोका असल्याच्या कारणावरून किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीनं स्वसंरक्षणार्थ बंदुकीचा परवाना दिला जातो. परवाना देताना संबंधित परवानाधारकाला पोलिसांकडून आता तीन दिवसांचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अशी माहिती गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

व्यक्तीच्या जीविताला धोका असेल तर मिळतो परवाना : राज्यात बंदुकीचा परवाना घेणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका असल्यास अथवा व्यक्ती सामाजिक, राजकीय किंवा एखाद्या उद्योगात कार्यरत असेल तर त्या व्यक्तीच्या जीविताला धोका आहे, असं मानण्यात येऊन संबंधित व्यक्तीला बंदूक परवाना दिला जातो. मात्र त्यासाठी संबंधित व्यक्तीला बंदूक हाताळण्याचं किंवा नेमबाजीचं प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं.



प्रशिक्षक संस्थांकडून बोगस प्रमाणपत्रे : कित्येकदा बंदुकीचा परवाना घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती या प्रशिक्षण न घेताच केवळ संबंधित संस्थांकडून बोगस प्रमाणपत्रे घेत असल्याच्या, अनेक बाबी समोर आल्या होत्या. या अनुषंगानं बंदूक परवाना घेऊन इच्छिणाऱ्या व्यक्तीला बंदूक हाताळण्याची माहिती असणं आवश्यक आहे. या दृष्टीनं राज्य सरकारच्या वतीनं आता निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागामार्फत संबंधितांना तीन दिवसाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.



कसे असेल प्रशिक्षण : या प्रशिक्षणामध्ये बंदूक कशाप्रकारे उघडायची, कशाप्रकारे साफ करायची किंवा बंदुकीत गोळी कशा पद्धतीने भरायची, बंदूक कशी रिकामी करायची याविषयी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. बंदुक कोणत्यावेळी आणि कोणत्या कोणातून चालवायची. त्यावेळेस चालवणाऱ्या व्यक्तीची पोझिशन कशी असायला पाहिजे याचंही प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे प्रशिक्षण पोलीस विभाग किंवा राज्य राखीव पोलीस दलाकडून दिलं जाणार आहे. तीन दिवसांच्या या प्रशिक्षणाच्या कालावधीत दररोज अडीच तासांचे सत्र असणार आहे. ज्यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे किंवा ज्यांना बंदुकीचा परवाना घ्यायचा आहे, त्यांना हे प्रशिक्षण उपयोगी ठरणार असल्याचंही गृह विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रशिक्षणासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. सदर प्रमाणपत्र शस्त्र परवान्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. Lal Bihari Mratak : 'मृतक' लाल बिहारीनं सरकारकडं मागितला AK-47 चा परवाना; म्हणाले जिवंत मृतकांच्या सुरक्षेसाठी परवाना आवश्यक
  2. Ghar Banduk Biryani Trailer : नागराज सयाजीचा जंगलात धमाका, आकाश ठोसरच्याही हाती बंदुक
  3. FCRA Licence Suspended: केंद्र सरकारने फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्टचा परवाना केला निलंबित, आयटी तपासणीमुळे घेतला निर्णय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.