ETV Bharat / state

Flowers Showering On Ganesh Idol: गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत श्रीगणेश मूर्तींवर मशीनद्वारे होते पुष्पवृष्टी, मैत्री फाउंडेशनचा उपक्रम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 7:17 PM IST

Flowers Showering On Ganesh Idol गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून अनेक गणेश मंंडळांकडून बाप्पांची जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे. (Ganesh Visarjan Procession Mumbai) या क्षणाचे औचित्य साधून (Ganesh Mandal Procession) मुंबईतील मैत्री फाउंडेशनच्या वतीने भायखळ्यामध्ये पश्चिम ना. म. जोशी मार्गावरील ठिकाणी पुष्पवृष्टी सोहळा आयोजित केला आहे. मुंबई शहरातील बहुतेक सर्वच सुप्रसिद्ध गणेश मंडळाची मिरवणूक या ठिकाणाहून जाते. (Ganesh Visarjan 2023)

Flowers Showering On Ganesh Idol
श्रीगणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी

गणेश मूर्तींवरील पुष्पवृष्टीविषयी सांगताना मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष

मुंबई Flowers Showering On Ganesh Idol: 'एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला', 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा प्रकारच्या बाप्पाच्या जयजयकाराने मुंबईनगरी दुमदुमून निघाली आहे. गणरायांची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबईत घरगुती बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन सकाळपासून करण्यास सुरुवात झाली आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात देखील झाली आहे. मिरवणुकीच्या संदर्भात मैत्री फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आगळ्या-वेगळ्या सोहळ्याचे आयोजन केले आहे.

श्रीगणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी सोहळा: दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मैत्री फाऊंडेशनच्या श्री गणेश पुष्पवृष्टी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक रवींद्र नेवगे यांच्या मार्गदर्शनाखाली भायखळ्यामध्ये पश्चिम ना. म. जोशी मार्गावरील ठिकाणी पुष्पवृष्टी सोहळा आयोजित केला आहे. मुंबई शहरातील बहुतेक सर्वच सुप्रसिद्ध गणेश मंडळाची मिरवणूक या ठिकाणाहून जाते. त्यामुळे येथून जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींवर पुष्पवृष्टी केली जात आहे.


शिवराज्याभिषेक सोहळ्याचे विशेष औचित्य: श्रीगणेश पुष्पवृष्टी सोहळा संदर्भात विनायक रवींद्र नेवगे यांनी माहिती दिली की, छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्यास यंदा साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील मोठ्या उत्साहात देशभरात साजरी झाली. याचे औचित्य साधत यावर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवकालीन प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. शिवकालीन साहसी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली गेली. जेणेकरून नवीन पिढीला ते ज्ञात व्हावे हा उद्देश आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री गणेश मूर्तीवर पुष्पवर्षाव केला जात आहे. गणेश मूर्ती विराजमान असलेल्या ट्रॉलींना खेचणाऱ्या गणेश मंडळाच्या सभासदांना मैत्री फाउंडेशनच्या वतीने एनर्जी ड्रिंक देखील दिले जात आहे. त्यासोबत संस्थेच्या वतीने वैद्यकीय मदत कक्ष दखील उभारण्यात आला होता. साधारणत: तीन वाजेपर्यंत 15 ते 20 सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांवरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. सकाळपासून गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यास सुरुवात झाली असून शेवटचा सार्वजनिक गणेश मंडळाचा बाप्पा जाईपर्यंत अशाच प्रकारची पुष्पवृष्टी सुरू असणार असल्याची माहिती विनायक नेवगे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Ganesh Laddu Auction In Hyderabad : गणेश प्रसादाला विक्रमी किंमत, 1.20 कोटी रुपयांना गणेश लाडूचा लिलाव
  2. Ganesh Visarjan 2023: छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत सर्वपक्षीय नेते उपस्थित, खैरेंच्या अनुपस्थितीनं पुन्हा चर्चा
  3. Ganesh Visarjan 2023: मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांची गर्दी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.