ETV Bharat / state

Kirit Somaiya on Sai Resort : साई रिसॉर्टवर आज हातोडा पडणारच; किरीट सोमय्या दापोलीत

author img

By

Published : Nov 22, 2022, 3:12 PM IST

अनिल परब (Former minister Anib Parab) यांचे कथित बेकायदेशीर साई रिसॉर्ट तोडण्याच्या (Sai resort demolished) इराद्याने पहाटे तीनच्या सुमारास किरीट सोमय्या आज दापोलीत गेले (kirit somaiya filed in Dapoli) आहेत. हाती प्रतिकात्मक हातोडा घेऊन सोमय्या रवाना झाले.

Kirit Somayya on Sai Resort
किरीट सोमय्या दापोलीत

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब (Former minister Anib Parab) यांचे कथित बेकायदेशीर साई रिसॉर्ट तोडण्याच्या (Sai resort demolished) इराद्याने पहाटे तीनच्या सुमारास किरीट सोमय्या आज दापोलीत गेले (kirit somaiya filed in Dapoli) आहेत. हाती प्रतिकात्मक हातोडा घेऊन सोमय्या रवाना झाले असून ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचे स्मारक तोडू या, असा नारा दिला आहे. kirit somaiyaon Sai Resort, Latest news from Mumbai

किरीट सोमय्या अनिल परबांवर बोलताना


साई रिसॉर्ट बांधकामप्रकरणी 420 चा गुन्हा दाखल- भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब यांच्यात गेल्या काही दिवसांपासून साई रिसॉर्टचा वाद रंगला आहे. दापोलीमधील साई रिसॉर्ट आज पाडले जाणार आहे. अनिल परब यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी सर्वांत आधी केला होता. तसेच दोन आठवड्यांपूर्वीच दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकामप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती किरीट सोमय्यांनी ट्विटरवर दिली होती.

किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोड्यासह

रिसॉर्ट तोडण्याचे आदेश पारित - रत्नागिरीतील अजून काही व्यक्तींवर हा गुन्हा दाखल झाल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. मात्र, हा रिसॉर्ट माझा नसल्याचा दावा सातत्याने अनिल परब यांच्याकडून केला जात होता. ईडी मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे हा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसारच यावर आज कारवाई होणार असल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे. कारवाई होणार असल्याने आपण दापोलीला आल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचे स्मारक तोडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.