ETV Bharat / state

Devendra Fadnavis News: मनसे-भाजपामधील मतभेदांना पूर्णविराम? फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी घेतलं बाप्पाचं दर्शन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 8:16 PM IST

Devendra Fadnavis visited  Raj Thackeray hom
Devendra Fadnavis visited Raj Thackeray hom

राज्यात गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असताना दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीची चर्चा सुरू झालीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गणेश चतुर्थीनिमित्त सागर या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. त्यानंतर राज्याचे सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.



राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन- आज राज्यभर गणेशोत्सव साजरा होत असताना लहानांपासून, मोठ्यांपर्यंत व घरगुती गणपती पासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत सर्व ठिकाणी गणपती बाप्पाची धूम सुरू आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानीसुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालं. राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस तसेच राज ठाकरे व अमृता फडणवीस व शर्मिला ठाकरे यांच्यात चांगल्या गप्पाही रंगल्या.

  • 🕓 4 pm | 19-9-2023 📍 Mumbai | संध्या. ४ वा. | १९-९-२०२३ 📍 मुंबई

    मनसे पक्षप्रमुख श्री राज ठाकरे जी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले !
    यावेळी अमृता, शर्मिला वहिनी उपस्थित होत्या.
    गणपती बाप्पा मोरया !@RajThackeray @fadnavis_amruta#GaneshChaturthipic.twitter.com/NFVFILRsRm

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


मुंबई - गोवा महामार्गावरून टीका- नुकतेच मुंबई -गोवा महामार्गावरून राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी राज ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटमसुद्धा दिला होता. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली होती. त्यामुळे मनसे आणि भाजपामधील नेत्यांमध्ये वाक्युद्धदेखील रंगे होते. आज फडणवीस यांनी सपत्नीक राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानं दोन्ही पक्षांमधील मतभेदांना आता पूर्णविराम मिळाला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.



राजकीय मतभेद विसरण्याची संस्कृती- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय नेत्यांकडून नेहमीच एकमेकांवर टीका-टिपण्णी केली जाते. परंतु वैयक्तिक स्तरावर हे नेते एकमेकांचे हितसंबंध चांगल्यापैकी जोपासून असतात. घरातील एखादे लग्नकार्य असेल किंवा एखादा धार्मिक सोहळा अथवा आरोग्याची समस्या याप्रसंगी हे सर्व नेते आपापसातले मतभेद विसरून एकत्र आल्याचं यापूर्वीही अनेकदा दिसून आलं आहे. राज ठाकरे यांनी भाजपबाबत अनेकदा आपली भूमिका बदलली असली तरी सध्याच्या परिस्थितीत ते भाजपच्या जवळच असल्याचे वारंवार दिसून आलं आहे.

हेही वाचा-

  1. Ganesh Festival 2023 : साहसी खेळ, ढोल ताशांच्या गजरात ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’तर्फे बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना
  2. Ganesh Festival 2023: सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या संत तुकाराम महाराजांच्या रूपात साकारली गणेशाची मूर्ती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.