ETV Bharat / state

CM Eknath Shinde : मुंबईतील नादुरुस्त रुग्णालयांना सरकार देणार 'टॉनिक'; मुख्यमंत्र्यांचा इशारा

author img

By

Published : Dec 28, 2022, 3:51 PM IST

भगवती रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, महात्मा गांधी रुग्णालये नादुरुस्त आहेत. तसेच मुंबई मनपा अख्यारित असलेली रुग्णालय दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असल्याने सोयी - सुविधांचा अभाव आहे. राज्य सरकारने अशा रुग्णालयांना आता 'टॉनिक' देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रुग्णालयाच्या कामात झालेल्या अनियमिततेची चौकशी करुन कारवाई करावी. (CM Eknath Shinde ordered the municipal corporation)

CM Eknath Shinde
मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची दुरावस्था झाली आहे. अनेक रुग्णालयात सोयी - सुविधांचा अभाव आहे. परिणामी रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. भगवती रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात तर आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेला तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश द्यावी, अशी मागणी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला करण्यात आली. येत्या महिनाभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुंबई मनपा आयुक्तांना दिल्याचे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. (avoid inconvenience to patients)

रूग्णालयात चांगली आरोग्य सुविधा दिली जात नाही : आमदार सचिन अहिर (Sachin Ahir), विलास पोतनीस (Vilas Potnis), सुनील शिंदे (Sunil Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad), प्रविण दरेकर (Pravin Darekar)आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी रुग्णालयाच्या कारभाराचे वाभाडे काढले. शवागृहांची अवस्था बिकट आहे (condition of mortuaries is bad). ईएसआय रुग्णालयात चांगली आरोग्य सुविधा दिली जात नाही. कंत्राटीकरण पध्दतीने आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयातील सेवा - सुविधांचा पाढा भगवती रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत सुमारे दोनशे कोटींचा घोटाळा झाला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या प्रसाद लाड यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. (Hospitals do not provide good healthcare facilities)


अत्याधुनिक सेवा- सुविधा देण्याचा राज्य सरकारचा मानस : मुंबईतील रुग्णालयात दर्जेदार सुविधा देण्यासाठी निधींची कमतरता भासू दिली जाणार नाही. ईएसआय रुग्णालयात ही चांगल्या सुविधा पुरवल्या जातील. रुग्णांना चांगल्या अत्याधुनिक सेवा- सुविधा देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. निविदा प्रक्रियेत अनियमितेबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल. रुग्णांची हेळसांड कदापि सहन केली जाणार नाही. त्यामुळे कोणालाही पाठीशी घालणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.


वरळीकरांना चांगली ट्रीटमेंट देऊ - मुख्यमंत्री : वरळीतील ईएसआय रुग्णालयात रुग्णांना चांगली सेवा मिळत नाही, अशी खंत आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी विधान परिषदेत व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावरुन वरळीकरांना चांगली ट्रीटमेंट देऊ, असा खोचक टोला लगावला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा हा मतदार संघ आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे सभागृहात सर्वांच्याच भूवया उंचावल्या. (Give good treatment to Worlikars)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.