ETV Bharat / state

Change In Emblem And Slogan: महाराष्ट्र सरकारच्या बोधचिन्ह, घोषवाक्यात बदल; अंबादास दानवेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

author img

By

Published : Mar 3, 2023, 10:55 PM IST

महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतीक असलेल्या बोधचिन्हाऐवजी मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या शासकीय पत्रांवर सरकारचे बोधचिन्ह, घोषवाक्यात बदल केल्याची धक्कादायक बाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या निदर्शनास आणून दिली. नाफेडच्या कांदा खरेदीसाठी लावलेल्या अटी-शर्तीवर ही दानवे आवाज उठवला.

Change In Emblem And Slogan
सरकारच्या बोधचिन्ह, घोषवाक्यात बदल

मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतीक असलेल्या बोधचिन्हात नंदादीप व त्याभोवती फुलली १६ कमळ होती. यावर संस्कृतमध्ये ब्रीद वाक्य होते. याचा अर्थ महाराष्ट्र राज्याच्या या मोहराची शान पहिल्या दिवसाच्या चंद्राप्रमाणे वाढत जाईल. हे जग पुजले जाईल आणि केवळ आपल्या लोकांच्या कल्याणासाठी चमकेल असा होतो. १७ व्या शतकातील मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या राजमुद्रा वर सापडलेल्या एका बोधवाक्यावर जुने बोधवाक्य आधारित आहे. राज्य शासनाने यात बदल केल्याची बाब दानवे यांनी विधान परिषदेत मांडली.


विधान परिषदेत आवाज: राज्य सरकारचे पूर्वी बोधचिन्ह नंदादीप व बाजूला कमळ असे होते, ते काढून मंत्रालयाची इमारत ठेवण्यात आलेली आहे. मग असे असताना घोषवाक्य बदलण्याचे कारण काय, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. तसेच सरकारने १० जानेवारी २०२३ रोजी याबाबत परिपत्रक काढले आहे. या सर्व बदलाच्या मागे कोण आहे. जुन्या बोधचिन्हाला कोणाचा विरोध होता. राज्य शासनाने त्याची माहिती द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले.


कांदा खरेदी नाफेडचा अजब मापदंड : एकीकडे कांदयाला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी त्रस्त असताना नाफेडने ५५- ७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. शासन मान्यताप्राप्त संस्था नाफेड जर ५५-७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असेल तर छोट्या आकाराच्या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन दिवसांपूर्वी २ रुपयांचा चेक देण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही अटी व शर्तीशिवाय नाफेड कांदा खरेदी करेल, असे सभागृहात म्हटले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती घेणार असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा: Palghar Crime : धक्कादायक! दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.