ETV Bharat / state

Beautification of Mumbai : 'मुंबईचे सुशोभीकरण म्हणजे मुंबईचा विकास नाही'

author img

By

Published : Jan 7, 2023, 6:50 PM IST

मुंबईच्या वातावरणावर पर्यावरण ( Atmosphere of Mumbai ) पर्यावरण अभ्यासांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) मुंबईच्या विकासासाठी 500 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, पर्यावरण अभ्यासांकडून मुंबईचे सुशोभीकरण केल्यास मुंबईतील वातावरणाला फटका बसेल ( Impact on the environment in Mumbai ) असे मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Beautification of Mumbai
मुंबईचे सुशोभीकरण म्हणजे मुंबईचा विकास नाही

मुंबईचे सुशोभीकरण म्हणजे मुंबईचा विकास नाही

मुंबई - मुंबईच्या सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी 500 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन केले आहे. मात्र सातत्याने मुंबईच्या ढासळणाऱ्या वातावरणावर पर्यावरण ( Atmosphere of Mumbai ) अभ्यासकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत ( Environment of Mumbai ) आहे. त्यातच पुन्हा एकदा नव्याने मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाची काम मुंबईत निघाल्यास मुंबईतील वातावरणाला त्याचा मोठा फटका ( Impact on the environment in Mumbai ) बसेल असेही मत पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे.

सुशोभीकरणासाठी 500 कोटींचा निधी - मुंबईच्या सुशोभीकरणासाठी शिंदे सरकारने 500 कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच काही दिवसापूर्वी गेले. मुंबईचा विकास गेल्या काही वर्षापासून खुंटला होता. मुंबईतले रस्ते सातत्याने खराब होत आहेत नवीन रस्ते बांधताना रस्त्याचा दर्जा अत्यंत खालचा असतो. त्यामुळे काही महिन्यातच रस्त्याची दुरावस्था होते. पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी निधी उभारावा लागतो. यासोबतच मुंबईचं शिवशोभीकरण देखील झालं पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विकास कामांचं भूमिपूजन केलं होतं. मुंबईत तीस वर्षे टिकतील असे रस्ते तयार केले जातील.

मुंबईवर परिणाम - मुंबईत जागोजागी सुशोभित शौचालय, कम्युनिटी वॉशिंग मशीन, झोपडपट्टी परिसरात हँगिंग लाईट सुविधा, बाग बगीचे, पर्यटन स्थळांचे डागडुजी असे अनेक कामांची सुरुवात मुंबईत केली जाणार आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा मुंबईत विकास कामांच्या नावावर बांधकामे केली गेल्यास त्याचा मोठा परिणाम मुंबईवर, मुंबईतल्या वातावरणावर होईल असं मत पर्यावरण वाद्यांकडून व्यक्त केले जाते आहे. आधीच गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुंबईच्या हवेची पातळी घसरताना पाहायला मिळते. त्यात मुंबई पुन्हा एकदा विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी, इतर बांधकामाची सुरुवात झाल्यास त्याचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला बसला शिवाय राहणार नाही अशी भीती पर्यावरण वाद्यांकडून व्यक्त केली जात आहे.



मुंबईला आरोग्याची गरज - मुंबईच्या सुशोभिकरणासाठी सरकार काही कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र मुंबईला आरोग्याची गरज आहे. हा खर्च मुख्यत्वे बांधकामांवर होणार, असलेल्या बागा तोडून त्या परत बांधा असा वायफळ खर्च केला जात आहे. माहीम रेल्वे स्थानकासमोर, मोरी रोड जंक्शनवरील बागा तोडल्या आहेत. याच विभागात असलेले देसाई मैदान नष्ट करणारी इमारतींची योजना आणली जात आहे. शहरात सर्वत्र मोकळ्या जागा गमावल्या जात असताना सुभोभिकरण ही धूळफेक ठरते. सीमेंटचे रस्ते करणे त्रासदायक ठरले आहे. यावर प्रचंड खर्च केला जात आहे. याचा रबडा समुद्रात टाकला जातो, नव्या रस्त्याच्या निर्माणात डोंगर तोडले जातात. अनेक पध्दतीने विनाश होतो. शहर धूळ, धूर, धुक्याने भरले आहे. नागरिकांचा श्वास कोंडत आहे. त्यात या सुशोभीकरणाच्या बांधकामांची भर पडली. शहरात वावरणे ताणतणावाचे, असुरक्षित बनले चालले असल्याची खंत पर्यावरण अभ्यासक गिरीश राऊत यांनी व्यक्त केली आहे.

हजारो झाडे तडली - मुंबईत सागरी रस्ता ( कोस्टल रोड) मेट्रो ३ भूयारी रेल्वे प्रकल्पात मॅनग्रोव्हची हजारो झाडे तडली जात आहेत. धारावी पुनर्विकासासारख्या प्रकल्पात अजून नष्ट होतील. चलन छापून, 'विकास' म्हणवला जाणारा हानिकारक व निरर्थक प्रकल्प केला जातो. परंतु गमावलेला निसर्ग पुन्हा मिळवता येत नाही. एकेकाळी अप्रतिम निसर्ग लाभलेल्या मुंबईला विकासाने बकाल केले. उरलेल्या प्राणवायू देणाऱ्या निसर्गाची मुंबईला गरज असून सुशोभिकरणाची आता तरी आवश्यकता नाही असेही गिरीश राऊत म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.